‘वेब पोर्टल’द्वारे परीक्षाविषयक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:58 AM2017-12-04T00:58:00+5:302017-12-04T00:58:44+5:30

Examination Information through 'Web Portal' | ‘वेब पोर्टल’द्वारे परीक्षाविषयक माहिती

‘वेब पोर्टल’द्वारे परीक्षाविषयक माहिती

Next

संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून आता वेब पोर्टलद्वारे परीक्षाविषयक सूचना आणि माहिती दिली जाणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य संकेतस्थळाशी हे नवे पोर्टल संलग्नित असणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ते कार्यान्वित होणार आहे.
परीक्षाविषयक कामकाजात जास्तीत जास्त प्रमाणात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने सिक्युर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी (एसआरपीडी, गोपनीय व नियंत्रित पद्धतीने प्रश्नपत्रिका वितरण), आॅनलाईन निकाल, डिजिटल प्रमाणपत्राची सुरुवात परीक्षा मंडळाने केली आहे. याअंतर्गत आणखी एक नवे पाऊल म्हणून आता या मंडळाचे वेब पोर्टल सुरू होणार आहे. परीक्षाविषयक सर्वप्रकारच्या सूचना, वेळापत्रके, अर्ज आदींचे आदान-प्रदान करण्यासाठी या पोर्टलचा वापर होईल. परीक्षेबाबतची माहिती संकलित करणे, त्यावर प्रक्रिया करणे आदी कामे देखील याद्वारे होतील. पोर्टलमध्ये आधुनिक पद्धतीने माहिती प्रकाशित होणार आहे. विद्यार्थी, महाविद्यालये, परीक्षा, दूरशिक्षण विभाग आणि पदवी, पदव्युत्तर, एम. फील., पीएच.डी. असे वर्गीकरण असणार आहे. त्यामुळे यातून हवी ती माहिती शोधणे सहज शक्य होईल. यामध्ये परीक्षांचे वेळापत्रक, अंतिम दिनांक आदी माहिती ठळक स्वरुपात दिसणार आहे. ई-मेल, एसएमएसद्वारे परीक्षेचे वेळापत्रक, अर्जाची मुदत यांची माहिती पाठविता येणार आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत कार्यान्वित
सध्या परीक्षाविषयक सूचना प्रकाशित करण्यासाठी (ङ्मल्ल’्रल्ली.२ँ्र५ं्न्र४ल्ल्र५ी१२्र३८.्रल्ल) या नावाने एक वेबपेज कार्यरत आहे. त्यातून हवी ती माहिती शोधणे थोडे अवघड ठरत आहे. त्यामुळे परीक्षाविषयक कामकाजातील गोपनीयता, काटेकोर कालबद्ध अंमबजावणी या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन या नव्या वेबपोर्टलचा वापर केला जाणार असल्याचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले. ते म्हणाले, परीक्षेबाबतची सर्व माहिती, सूचना विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे. कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली या वेब पोर्टल निर्मितीचे काम सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ते कार्यान्वित केले जाईल.

Web Title: Examination Information through 'Web Portal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.