‘एज्युकेशनल समर कॅम्प’ची उत्साहात सांगता : स्टोरी टेलिंग, हँडरायटिंग, रोबोटेकबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:57 AM2019-06-01T00:57:23+5:302019-06-01T00:58:17+5:30

सुटी म्हटलं की, मुलांपेक्षा पालकांना प्रश्न पडतो की, या सुटीत मुलांना कुठे गुंतवून ठेवायचे आणि मग शोधाशोध सुरू होते, ती वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरांची; पण मुलांची आवड आणि त्याचा शालेय जीवनात उपयोग झाला पाहिजे, असा पालकांचा हट्ट असतो, म्हणूनच ‘लोकमत’च्या बाल विकास मंचने ‘एज्युकेशनल समर कॅम्प’चे आयोजन

 Explains 'Educational Summar Camp': Story telling, handwriting, guide on robottech | ‘एज्युकेशनल समर कॅम्प’ची उत्साहात सांगता : स्टोरी टेलिंग, हँडरायटिंग, रोबोटेकबाबत मार्गदर्शन

‘लोकमत’ बालविकास मंचतर्फे आयोजित एज्युकेशनल समर कॅम्पच्या समारोपप्रसंगी उपस्थित विद्यार्थी आणि प्रशिक्षक. ‘बाल विकास मंच’च्या सन २०१९-२० मधील नोंदणीनंतर दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू दाखविताना विद्यार्थिनी श्रावस्ती ढेरे.

Next
ठळक मुद्देलोकमत बाल विकास मंचतर्फे आयोजन

कोल्हापूर : सुटी म्हटलं की, मुलांपेक्षा पालकांना प्रश्न पडतो की, या सुटीत मुलांना कुठे गुंतवून ठेवायचे आणि मग शोधाशोध सुरू होते, ती वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरांची; पण मुलांची आवड आणि त्याचा शालेय जीवनात उपयोग झाला पाहिजे, असा पालकांचा हट्ट असतो, म्हणूनच ‘लोकमत’च्या बाल विकास मंचने ‘एज्युकेशनल समर कॅम्प’चे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये या कॅम्पचा शुक्रवारी समारोप झाला.

येथील स्टर्लिंग टॉवरमधील डायस अकॅडमीमध्ये शनिवार (दि. २५) पासून या कॅम्पची सुरुवात झाली. त्यामध्ये मुलांना रोज वेगळ्या गोष्टी शिकविण्यात येत होत्या. त्यात स्टोरी टेलिंग, हॅन्डरायटिंग, रोबोटेक, मॅथेमॅटिकल ट्रिक्स, स्टेज डेरिंग, विज्ञानातील गमतीजमती आणि विनागॅस पदार्थ बनविणे शिकविण्यात आले. स्टोरी टेलिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला. प्रशिक्षिका अनघा मेहतर यांनी मुलांना वेगवेगळे शब्द देऊन स्वत: कशा गोष्टी तयार करायच्या हे शिकविले. सोनाली देसाई यांनी वळणदार अक्षर कसे काढावे.

गणित विषय सोप्या सोप्या ट्रिक्स वापरून सोपा कसा करायचा, हे शिकविले. मुलांना नेहमीच उत्सुकता असलेले रोबोट स्वत: बनवून ते चालविताना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याचे प्रशिक्षण रोबोस्ट्रॉमस एज्युकेशन सेंटर प्रायव्हेट लिमिटेडच्या सुधीर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय सोप्या पद्धतीत दिले. सध्या मुलांना विविध क्षेत्रामध्ये स्टेज डेरिंग खूप महत्त्वाचे असते, ते कसे आत्मसात करायचे याबाबत सुरेश विटेकर यांनी मार्गदर्शन केले.

विज्ञान हा विषय पुस्तक वाचून शिकण्यापेक्षा प्रात्यक्षिक करून शिकला, तर तो कायमस्वरूपी कसा लक्षात राहतो, हे डायस अकॅडमीच्या दिशा पाटील यांनी प्रात्यक्षिकांसह सांगितले. आई घरी नसताना भूक लागली तर गॅस न वापरता छान खाऊ कसा बनवायचा हे मुलांना रंजक पद्धतीने उज्ज्वला कुकिंग क्लासच्या उज्ज्वला भोसले यांनी शिकविले. शेवटच्या दिवशी सर्व मुलांचे पालकांसहित स्नेहसंमेलन घेण्यात आले. त्यामध्ये दिशा पाटील यांनी सर्व पालकांना मुलांच्या भविष्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले.


‘बाल विकास मंच’साठी लवकरच नोंदणी
जून २०१९ ‘बाल विकास मंच’ची सभासद नोंदणी सुरूहोणार आहे. यावर्षी मिळणाऱ्या हमखास भेटवस्तूंचे अनावरण या एज्युकेशनल समर कॅम्पच्या समारोपावेळी प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. फक्त२00 रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना सेलोची वॉटर बॉटल आणि टिफिन बॉक्स देण्यात येणार आहे; शिवाय लाखोंचा लकी ड्रॉ आणि वर्षभर कार्यक्रमांचा खजिना मिळणार आहे.


माझी मुलगी गेले तीन वर्षे बाल विकास मंचची सभासद आहे. या कॅम्पमध्ये तिच्यामध्ये खूपच बदल झाला आहे. तिचा मोबाईल, टी. व्ही. पाहणे कमी झाले आहे. तिचे कुतूहल वाढले. या कॅम्पसाठी ‘लोकमत’चे आभार मानते.
- प्राजक्ता ढेरे, पालक

 

Web Title:  Explains 'Educational Summar Camp': Story telling, handwriting, guide on robottech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.