शिरोलीत भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:26 AM2021-09-21T04:26:05+5:302021-09-21T04:26:05+5:30
शिरोली ग्रामपंचायतीमध्ये मूर्तीच्या विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली होती. यामध्ये गाव तलावाच्या भोवती मूर्ती विसर्जनासाठी श्री बिरदेव मंदिर, ...
शिरोली ग्रामपंचायतीमध्ये मूर्तीच्या विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली होती. यामध्ये गाव तलावाच्या भोवती मूर्ती विसर्जनासाठी श्री बिरदेव मंदिर, शाहू दूध डेअरी, श्री सर्वेश्वर तरुण मंडळ माळवाडी या ठिकाणी घरगुती गणेश मूर्ती गौरी कुंड उभा केले होते. या ठिकाणी पर्यावरण पूरक विसर्जन केले. घरगुती व मंडळांच्या मूर्ती विसर्जित करण्यात आल्या विसर्जनाची सोय सर्वेश्वर माळवाडी व तलाव पाणवठा येथून करण्यात आली होती.
पोलिसांनी तरुण मंडळांना व शिरोली ग्रामस्थांना आवाहन केल्याप्रमाणे सर्वांनी मिरवणूक व विसर्जनाच्या ठिकाणी योग्य ती कोविड १९ चे संभाव्य धोका लक्षात घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव पार पाडला विसर्जनाच्या ठिकाणी नागरिकांना झाडे वाटप करण्यात आली, शिरोली सरपंच शिकांत खवरे उपसरपंच सुरेश यादव, ग्रामविकास अधिकारी व्ही बी भोगण, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, प्रकाश कौंदाडे, सलीम महात, ज्योतिराम पोर्लेकर उपस्थित होते. या सर्व विसर्जनाच्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनी या कामी परिश्रम घेतले.
फोटो ओळी शिरोलीत पर्यावरणपूरक विसर्जन करताना सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, बाजीराव पाटील, जोतिराम पोर्लेकर, व्ही. बी. भोगण आदी.