नागपूर-रत्नागिरी महामार्गाविरोधात शेतकरी संघटनेचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:05+5:302021-09-24T04:30:05+5:30

हा महामार्ग शिये, भूये, केर्ली, केर्ले, पडवळवाडी या गावातून जात आहे. येथे महापूर येत असल्याने महामार्गामुळे त्याची तीव्रता अधिक ...

Farmers' fast against Nagpur-Ratnagiri highway | नागपूर-रत्नागिरी महामार्गाविरोधात शेतकरी संघटनेचे उपोषण

नागपूर-रत्नागिरी महामार्गाविरोधात शेतकरी संघटनेचे उपोषण

Next

हा महामार्ग शिये, भूये, केर्ली, केर्ले, पडवळवाडी या गावातून जात आहे. येथे महापूर येत असल्याने महामार्गामुळे त्याची तीव्रता अधिक वाढणार आहे. हा रस्ता हातकणंगले, वाठार, बाेरपाडळे या जवळच्या मार्गावरून जावू शकत असतानाही रस्ते महामंडळाने जाणीवपूर्वक लांबचा मार्ग काढला आहे. यामुळे ४०० शेतकरी भूमिहीन होणार आहेत. तसेच जलस्रोतांचे नुकसान होणार आहे. असे असतानाही भूसंपादनाची व मोजणी कोणतीही नोटीस न काढता, हरकती, त्यावर सुनावणी न घेता जागेची मोजणी केली जात आहे. हा प्रकार बेकायदेशीर असून, तो तातडीने थांबवण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे, अभिजीत पाटील, पडवळवाडीचे सरपंच पोपट अतिग्रे, परशराम शिंदे, मानसिंग पाटील यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

---

Web Title: Farmers' fast against Nagpur-Ratnagiri highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.