निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीस पंधरा लाखांचा निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:24 AM2020-12-22T04:24:15+5:302020-12-22T04:24:15+5:30
शिये : जिल्हा परिषद मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होईल अशा ग्रामपंचायतीस पंधरा लाखांचा निधी देणार असल्याचे जिल्हा परिषद ...
शिये : जिल्हा परिषद मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होईल अशा ग्रामपंचायतीस पंधरा लाखांचा निधी देणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे यांनी सांगितले.
शिये जिल्हा परिषद मतदारसंघातील शिये, भुयेवाडी, निगवे दुमाला, केर्ली, पडळवाडी, रजपूतवाडी या सहा ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. ग्रामपंचायत वगळता सर्वच निवडणुका पक्षीय पातळीवर होत असतात, पण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावातील एकमेकांमध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता असते तसेच पैशाचा अपव्यय टाळून गावचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करणे योग्य पर्याय असून त्याकरिता संबंधित ग्रामपंचायतीस पंधरा लाखांचा निधी देणार असून या निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन मनीषा कुरणे यांनी केले आहे.
फोटो
मनीषा कुरणे जिल्हा परिषद सदस्या