रात्री बारानंतरही अग्निशमन दल कार्यालय अलर्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:27 AM2021-09-14T04:27:38+5:302021-09-14T04:27:38+5:30
कोल्हापूर : येथील महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कार्यालय रात्री बारानंतरही अलर्ट असल्याचे रविवारी रात्री एक वाजता दिसून आले. कर्मचारीही सतर्क ...
कोल्हापूर : येथील महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कार्यालय रात्री बारानंतरही अलर्ट असल्याचे रविवारी रात्री एक वाजता दिसून आले. कर्मचारीही सतर्क होते. बंबही तयार होता.
शहर आणि उपनगरात गणेशोत्सवाची धांदल सुरू आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना करून आकर्षक आणि लक्षवेधी विद्युत रोषणाई केली आहे. पावसाची रिपरिपही आहे. अशा परिस्थितीत शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते. यामुळे लोकमतने रविवारी मध्यरात्री महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील अग्निशमन दलाच्या कार्यालयातील यंत्रणा किती सतर्क आहे याची रियालॅटी चेक केली. त्या वेळी चालकासह चार कर्मचारी कामावर होते. एक कर्मचारी आलेले फोन घेत होता. उर्वरित विश्रांत कक्षात मोबईलवर व्यस्त होते.
लोगो - रियालिटी चेक
अग्नीशमन विभाग कार्यालय @ 1:00am
१) तयार स्थितीत बंब एक
अग्निशमन कार्यालयाजवळ एक बंब तैनात होता. कोणत्याही क्षणी आगीची वर्दी मिळताच मार्गस्थ होण्याच्या तयारीमध्ये तो उभा होता.
२) चालक जागा
बंबाच्या चालकाच्या चेहरा कंटाळवाणा झाला होता. डोळ्यांत झोप आल्याचे दिसत होती. मात्र तो जागाच होता. झोप येताच तो मोबाईलमध्ये डोकावत किंवा कार्यालयात फेऱ्या मारताना दिसला.
३) कर्मचारी जागे
महापालिका अग्निशमन कार्यालयात चार कर्मचारी होते. तेथील दोन कर्मचारी झोपेच्या तयारीत होते. तोपर्यंत लोकमतचे प्रतिनिधी तेथे पोहोचताच ते हडबडून उठून उभे राहिले. सर्वच कर्मचारी फोन कॉलच्या खुर्चीजवळ येऊन बसले.
४) नियम काय सांगतो?
अग्निशमन कार्यालयात आठ तासांच्या ड्युटीवर सात कर्मचारी असणे आवश्यक आहे. पण कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने चारच जण कार्यरत असतात. यामध्ये एक चालक, एक फोन ऑपरेटर, दोन फायरमन असे कर्मचारी सेवेत होते. आग मोठी असल्यास महापालिकेच्या इतर कावळा नाका, कसबा बावडा, मार्केट यार्ड, प्रतिभानगर, टिंबर मार्केट, फुलेवाडी येथे असलेल्या अग्निशमन केंदातील कार्यालयातील कर्मचारी आणि बंबना पाचारण केले जाते.
रोज एक ते दोन कॉल
अपघात, आगीच्या घटनेचे रोज दोन ते तीन कॉल अग्निशमन विभागाकडे येतात. आग लागल्यास विझवण्यासाठी अपघात झाल्यास मदतीसाठी पाचारण केले जाते. शहर हद्दीत ही सेवा मोफत आहे. हद्दीबाहेर तासाला ९०० ते एक हजार रूपये भाडे आकारले जाते.
५) अग्निशमन विभागप्रमुखाचा कोट
अग्निशमन विभागातील एका केंद्रातील कार्यालयात सात कर्मचारी असणे आवश्यक आहे. पण कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने चारच कर्मचारी असतात. सेवा तत्पर देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. आगीची किंवा अपघाताची वर्दी मिळताच लवकरात लवकर संबंधित ठिकाणी पोहचले जाते.
रणजित चिले, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका