प्रथम ‘अँटिजन’ मगच दुचाकी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:26 AM2021-05-25T04:26:23+5:302021-05-25T04:26:23+5:30
कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीं पोलिसांनी जप्त केल्या होत्या, त्या पूर्ववत मालकाला परत देण्याची कार्यवाही सोमवारपासून सुरू ...
कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीं पोलिसांनी जप्त केल्या होत्या, त्या पूर्ववत मालकाला परत देण्याची कार्यवाही सोमवारपासून सुरू केली. दुचाकी परत हवी असल्यास प्रथम कोरोनाची जागीच ‘अँटिजन’ चाचणी बंधनकारक केले. त्यामुळे दुचाकीमालकांची शहर वाहतूक शाखेच्या आवारातच अँटिजन चाचणी करूनच दंड आकारून ती ताब्यात दिली जात होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे सव्वा महिन्याच्या लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकींना कायद्याचा दंडुका दाखविला. दि.१५ एप्रिल ते २३ मेपर्यंत शहरात सुमारे २४८५ दुचाकी वाहने जप्त केली. त्यापैकी २८६ दुचाकी कडक लॉकडाऊनच्या आठवड्यात आहेत. जप्त वाहने सोमवारपासून मालकांना परत देण्याची कार्यवाही शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने सुरू केली. त्यामुळे दुचाकी नेण्यासाठी वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर प्रचंड रांग लागल्या होत्या.
दुचाकीमालकाची गर्दी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगचे बॉक्स आखले. मालकाचे हात प्रथम सॅनिटायझरींग करूनच त्याला आवारात घेतले जात होते. मास्क तपासून दक्षता म्हणून तेथेच ‘अँटिजन’ चाचणी घेण्यात येत होती. त्यानंतर दुचाकीची कागदपत्रे तपासून दंड भरून टोकन दिले जात होते. टोकन घेऊन मेन राजाराम हायस्कूलच्या आवारातून दुचाकी ताब्यात दिली जात होती.
रोज किमान १०० दुचाकी परत
जप्त दुचाकींची संख्या जास्त असल्याने परत देताना गर्दी होऊ नये यासाठी दुचाकीमालकांना दुचाकी परतीची तारीख व वेळ दिली आहे. रोज किमान १०० दुचाकी देण्याचे नियोजन केले. पहिल्याच दिवशी सुमारे ८४ दुचाकी दिल्या. दुचाकीमालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड, आरसी बुक तपासले जाते. त्या दुचाकीवरील पेंडिंग दंड तसेच इन्शुरन्स अगर लायसन्स आहे का? हे तपासूनच दंड आकारून दुचाकी ताब्यात दिली जात होती.
वाहनांना ६६ लाख रुपये दंड
दि. १५ एप्रिल ते २३ मेपर्यंत कोल्हापूर शहरात सुमारे ३१,६३३ दुचाकी वाहनामालकांवर गुन्हे नोंदविले. त्यांचा दंड सुमारे ६६ लाख २ हजार ८०० रुपये आकारणी केला आहे. त्यापैकी ८२१७ दुचाकीचालकांनी १६ लाख ९७ हजार ४०० रुपये दंड भरला तर अद्याप २३,४१६ दुचाकीमालकांकडून सुमारे ४९ लाख ५ हजार ४०० रुपये दंड अनपेड आहे.
कोट..
जप्त दुचाकी परत देताना दक्षता म्हणून दुचाकीमालकाची ‘अँटिजन’ चाचणी करून घेण्यात येत आहे, कागदपत्रे तपासून दंड आकारून दुचाकीमालकाच्या ताब्यात देण्यात येत आहे. दुचाकी नेण्यासाठी गर्दी होणार नाही यासाठी योग्य नियोजन केले आहे.
- स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, कोल्हापूर
फोटो नं. २४०५२०२१-कोल-सीटी ट्रॅफीक ऑफीस०१
ओळ : लॉकडाऊनमध्ये जप्त केलेल्या दुचाकी परत देण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. दुचाकी नेण्यासाठी कोल्हापुरात शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्या होत्या. (छाया : नसीर अत्तार)
फोटो नं. २४०५२०२१-कोल-सीटी ट्रॅफीक ऑफीस०२
ओळ : दुचाकी देण्यापूर्वी वाहतूक शाखेच्या आवारातच प्रत्येक दुचाकीमालकाची ‘अँटिजन’ चाचणी केली जात होती. (छाया : नसीर अत्तार)
===Photopath===
240521\24kol_6_24052021_5.jpg~240521\24kol_7_24052021_5.jpg
===Caption===
फोटो नं. २४०५२०२१-कोल-सीटी ट्रॅफीक ऑफीस०१ओळ : लॉकडाऊनमध्ये जप्त केलेल्या दुचाकी परत देण्याची प्रक्रीया सोमवारपासून सुरु झाली. दुचाकी नेण्यासाठी कोल्हापूरात शहर वाहतुक शाखेच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्या होत्या. (छाया: नसीर अत्तार)फोटो नं. २४०५२०२१-कोल-सीटी ट्रॅफीक ऑफीस०२ओळ : दुचाकी देण्यापूर्वी वाहतुक शाखेच्या आवारातच प्रत्येक दुचाकीमालकाची ‘ॲन्टीजेन’ चाचणी केली जात होती. (छाया: नसीर अत्तार)~फोटो नं. २४०५२०२१-कोल-सीटी ट्रॅफीक ऑफीस०१ओळ : लॉकडाऊनमध्ये जप्त केलेल्या दुचाकी परत देण्याची प्रक्रीया सोमवारपासून सुरु झाली. दुचाकी नेण्यासाठी कोल्हापूरात शहर वाहतुक शाखेच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्या होत्या. (छाया: नसीर अत्तार)फोटो नं. २४०५२०२१-कोल-सीटी ट्रॅफीक ऑफीस०२ओळ : दुचाकी देण्यापूर्वी वाहतुक शाखेच्या आवारातच प्रत्येक दुचाकीमालकाची ‘ॲन्टीजेन’ चाचणी केली जात होती. (छाया: नसीर अत्तार)