जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांनी पंतप्रधान घरकुल, रमाई घरकुल योजनेत जास्तीतजास्त गरजूंना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न केले त्यामुळे ग्रामपंचायतीने अंबप गावात नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण करून घेतली. प्रतिलाभार्थी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. चार टप्प्यातील अनुदान तत्काळ मिळवीत योजनेचे काम प्रभावीपणे राबविले आहे, त्यामुळे तालुक्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत महाआवास पुरस्कारात अंबपचा प्रथम क्रमांक आला. तसेच या योजनेतून उत्कृष्ट पद्धतीने घर बांधल्याबद्दल आदर्श घरकुलचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नागनाथ पांडुरंग कांबळे अंबप यांना, तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार अंबप च्या मंगल मारुती कांबळे यांना मिळाला, अशी माहिती सरपंच बी. एस. अंबपकर यांनी दिली.
यावेळी उपसरपंच बाळासो माने, सदस्य राजेंद्र माने, कृष्णात गायकवाड, सोनाली जाधव, माधुरी कांबळे, सलमा मुल्ला, ग्रामविकास अधिकारी मुसळे उपस्थित होते.
फोटो ओळी-हातकणंगले तालुक्यात महाआवास योजनेतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अंबप ग्रामपंचायतीला मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांच्या हस्ते सरपंच बी. एस. अंबपकर यांचा सत्कार केला. या वेळी विजयसिंह माने, संतोष उंडे, रोहित निलजे उपस्थित होते.