राजेंद्रनगरात पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 11:50 AM2021-03-30T11:50:28+5:302021-03-30T11:52:43+5:30

Crimenews Kolhapur- किरकोळ कारणांवरुन राजेंद्रनगरात झालेल्या मारामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या महिलांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार दोन्ही गटाच्या एकूण पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

Five persons were raped in Rajendranagar | राजेंद्रनगरात पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा

राजेंद्रनगरात पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा

Next
ठळक मुद्देराजेंद्रनगरात पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा किरकोळ कारणांवरुन मारामारी : परस्पर विरोधी तक्रार

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरुन राजेंद्रनगरात झालेल्या मारामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या महिलांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार दोन्ही गटाच्या एकूण पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विकास काळे व संबंधित महिलेची तोंड ओळख होती. रविवारी रात्री विकास, मंगेश आणि सोनू हे तिघे संबंधित महिलेच्या घरी गेले. महिलेकडे तिच्या पतीचा मोबाईल क्रमांक मागितला.

महिलेने तो देण्यास नकार दिला. त्यावरुन वादावादी होऊन त्यांनी महिलेस व तिच्या मुलीस शिवीगाळ, धक्काबुक्कीही केली. दरम्यान, महिलेचे दोघे भाऊ घटनास्थळी आले, त्यांनाही त्यांनी शिवीगाळ करत दारात उभ्या केलेल्या दुचाकीची मोडतोड केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, दुसऱ्या महिलेने दिलेल्या विरोधी तक्रारीनुसार, भाच्याला सोडण्यासाठी गेले असता दोघांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून विनयभंग केला. या प्रकरणी राहुल कुरुंगळे, नागेश कुरुंगळे या दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Five persons were raped in Rajendranagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.