इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षपुत्रास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:29 AM2021-08-13T04:29:10+5:302021-08-13T04:29:10+5:30

कोल्हापूर : विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षपुत्रास शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. अमित ...

Former mayor's son arrested in Islampur | इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षपुत्रास अटक

इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षपुत्रास अटक

Next

कोल्हापूर : विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षपुत्रास शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. अमित आनंदराव मलगुंडे (वय ३४, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे अटक केलेल्या त्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमित मलगुंडे हा विवाहित असून तो इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आनंदराव मलगुंडे यांचा मुलगा आहे. पीडित महिला ही मूळची सांगली जिल्ह्यातील असून त्या आपल्या कुटुंबासह कोल्हापुरात राहतात. तिच्याशी अमित मलगुंडे याची ओळख होती. त्याने मोबाईलवर स्वत:चे व पीडित महिलेचे फोटो काढून ते पीडितेच्या बहिणीला पाठविले. त्यानुसार पीडितेच्या पतीचा चुकीचा समज करून दिला. त्यातून पीडितेला त्यांच्या पतीकडून घटस्फोट घेण्यास प्रोत्साहन दिले. संशयिताने आपल्या पत्नीला घटस्फोट दिल्याबाबतची माहिती सांगून पीडितेचा विश्वास संपादन केला. तिला लग्नाचे आमिष दाखवून, वर्षभर तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने तिच्याशी लग्नास नकार देऊन, शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने अमित मलगुंडे याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली. याबाबत पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील तपास करीत आहेत.

फोटो नं. १२०८२०२१-कोल-अमित मलगुंडे (आरोपी)

120821\12kol_19_12082021_5.jpg

फोटो नं. १२०८२०२१-कोल-अमीत मलगुंडे (आरोपी)

Web Title: Former mayor's son arrested in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.