Swine flu: कोल्हापूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे चार बळी, ३३ जणांना झाली लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 04:07 PM2022-07-27T16:07:25+5:302022-07-27T16:07:46+5:30

कोरोना, डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना आता स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले

Four victims of swine flu, 33 infected in Kolhapur district | Swine flu: कोल्हापूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे चार बळी, ३३ जणांना झाली लागण

Swine flu: कोल्हापूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे चार बळी, ३३ जणांना झाली लागण

Next

कोल्हापूर : जिल्ह्यात एकीकडे कोरोना, डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना आता स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३ जणांना स्वाइन फ्लू झाला असून, यातील चौघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या वाढत आहे. गडहिंग्लजप्रमाणे अनेक ठिकाणी चिकुनगुनियाचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यू झालेल्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. अशातच आता स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. आतापर्यंत ३३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. यापैकी २० जण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत, तर चौघांचा मृत्यू झाला आहे. ९ जणांची तब्येत बरी झाल्याने त्यांना डिस्सार्ज देण्यात आला आहे.

५१ ते ६० वयोगटातील नागरिकांंची यामध्ये संख्या अधिक असून, याखालोखाल पाच जण जे ६१ ते ७० वयोगटातील आहेत अशांना स्वाइन फ्लू झाला आहे. कोल्हापूर शहर आणि अन्य जिल्ह्यातील रुग्णांची संख्या प्रत्येकी आठ असून, त्याखालोगाल करवीर तालुक्यात चार रुग्ण आहेत.

दुखणे अंगावर काढू नका

स्वाइन फ्लू हा व्हायरल इन्फेक्शनचाच प्रकार असून, कोणतेही दुखणे अंगावर काढू नका, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे. कोरोना संपूर्ण गेल्याप्रमाणे नागरिकांचे वर्तन सुरू आहे. मास्कचा वापर बंद केला आहे; परंतु हे घातक आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

Web Title: Four victims of swine flu, 33 infected in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.