कोल्हापुरात चार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक 

By उद्धव गोडसे | Published: July 22, 2023 07:09 PM2023-07-22T19:09:09+5:302023-07-22T19:12:19+5:30

कामानिमित्त महिला बाहेर गेल्याचे पाहून त्याने घरात एकट्या असलेल्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले

Four year old girl sexually assaulted in Kolhapur, suspect arrested | कोल्हापुरात चार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक 

कोल्हापुरात चार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक 

googlenewsNext

कोल्हापूर : शहरातील एका पेठेत शेजारीच राहणाऱ्या नात्यातील चार वर्षीय बालिकेवर चांदी कारागिराने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी शैलेंद्र सखाराम पाटील (वय ४४, सध्या रा. कोल्हापूर शहर, मूळ रा. मुरगुड, ता. कागल) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला शनिवारी (दि. २२) अटक केली. न्यायालयात हजर केले असता, त्याची मंगळवारपर्यंत (दि. २५) पोलिस कोठडीत रवानगी झाली.

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती कामानिमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे ही महिला तिच्या मुलीसह शहरातली एका पेठेत राहते. शेजारीच तिच्या नात्यातील चांदी कारागिर शैलेंद्र पाटील हा राहतो.

कामानिमित्त महिला बाहेर गेल्याचे पाहून त्याने घरात एकट्या असलेल्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार दोन जून ते १६ जुलै दरम्यान घडला. पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आईने जाब विचारताच संशयिताने उडवाउडवीची उत्तरे दिली. बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समजताच परिसरातील महिला आणि नागरिकांनी चोप देऊन पाटील याला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पाटील याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. न्यायालयात हजर केले असता, त्याला  २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Four year old girl sexually assaulted in Kolhapur, suspect arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.