चौकटी, फोटो ओळी (नवसंकल्पकांच्या प्रयत्नांना ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’चे पाठबळ)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:34+5:302021-01-16T04:29:34+5:30
कल्पनाशक्तीला संधी देणे आवश्यक स्टार्टअप म्हणजे केवळ तंत्रज्ञान नाही. या संकल्पनेला देश, शहर, ग्रामीण, अशी कोणतीही बंधने नाहीत. विविध ...
कल्पनाशक्तीला संधी देणे आवश्यक
स्टार्टअप म्हणजे केवळ तंत्रज्ञान नाही. या संकल्पनेला देश, शहर, ग्रामीण, अशी कोणतीही बंधने नाहीत. विविध प्रकारची बिझनेस मॉडेल स्टार्टअप म्हणून सुरू झाली आहेत. कोल्हापूरमधील तरुणाईकडे अनेक नावीन्यपूर्ण कल्पना आहेत. त्यांच्यासाठी ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’ हे मोलाचे व्यासपीठ ठरणार आहे. निविदाप्रक्रियेसारखे शासकीय नियम बाजूला ठेवून तरुणाईच्या कल्पनाशक्ती, नवसंकल्पनांना संधी देणे आवश्यक असल्याचे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.
फोटो (१५०१२०२१-कोल-स्टार्टअप कार्यक्रम) : कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर आणि डी.वाय. पाटील ग्रुपचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’चे ऑनलाइन उद्घाटन शुक्रवारी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, आयआयटी कानपूरच्या इनोव्हेशन सेंटरचे डॉ. अमिताभ बंडोपाध्याय उपस्थित होते.