कोल्हापूर महापालिकेच्या शाळांमध्ये मोफत ‘सॅनिटरी नॅपकीन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:04 AM2017-11-05T01:04:01+5:302017-11-05T01:08:08+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या शाळांमधील गरीब, वंचित विद्यार्थिनींना मोफत ‘सॅनिटरी नॅपकीन’ देण्यात येणार आहेत. एका तरुण अभियंत्याने ‘शिबॉक्स’ (रँीुङ्म७) नावाने सुरू केलेल्या या संकल्पनेला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद
भरत बुटाले ।
कोल्हापूर : महापालिकेच्या शाळांमधील गरीब, वंचित विद्यार्थिनींना मोफत ‘सॅनिटरी नॅपकीन’ देण्यात येणार आहेत. एका तरुण अभियंत्याने ‘शिबॉक्स’ (रँीुङ्म७) नावाने सुरू केलेल्या या संकल्पनेला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिनाभरात सोशल मीडियासह विविध माध्यमांतून या उपक्रमासाठी १५ हजार रुपये जमा झाले आहेत. २५ नोव्हेंबर २०१७ या उपक्रमाचा प्रारंभ होत आहे.
गोविंद बळीराम मोघेकर हे मूळचे लातूरचे. त्यांनी कोल्हापुरातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. समाजकार्यात त्यांचा पुढाकार असतो. अनेक गरीब विद्यार्थिनी ‘मासिक पाळी’च्या काळात शाळेला येत नाहीत. त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या विद्यार्थिनींना मोफत ‘सॅनिटरी नॅपकीन’ देण्याची कल्पना मोघेकर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई यांच्यासमोर मांडली. सरदेसाई यांनी तीच कल्पना त्यांच्या सहकाºयांसमोर मांडली. त्याला सर्वांनी मान्यता दिली. या उपक्रमासाठी गोविंद मोघेकर
आणि भाग्यश्री तवर यांनी ६६६.२ँीुङ्म७.्रल्ल या वेबसाईटची निर्मिती केली. वेबसाईट व सोशल मीडियावरून या उपक्रमाला आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. महाराष्टÑाबरोबरच देशभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आॅस्ट्रेलियास्थित रेश्मा पाटील यांनीही दोन हजार रुपयांची मदत या उपक्रमासाठी पाठवून दिली आहे. आतापर्यंत १५ हजार रुपये जमा झाले आहेत.
कोल्हापूर महापालिकेच्या ५९ शाळा असून, मोफत सॅनिटरी नॅपकीनची आवश्यकता असणाºया २५० वर विद्यार्थिनी आहेत.वर्षभरात लागणाºया सॅनिटरीनॅपकीनसाठी २८ हजारांच्या आसपास निधीची आवश्यकता आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या १५ शाळांना २५ नोव्हेंबर २०१७ या दिवशी नॅपकीनचे वाटप करण्यात येणार आहे.
१६ टक्केच महिलांकडून वापर
एका सर्व्हेच्या पाहणीतून असे आढळले आहे की, भारतातील केवळ १६ टक्केच महिला ‘सॅनिटरी नॅपकीन’चा वापर करतात. प्रबोधनाच्या अभावामुळे २३ टक्के मुली महिन्यातून ४ ते ५ दिवस शाळेला गैरहजर राहतात.
शिक्षक समितीचा पुढाकार विद्यार्थिहिताचे नवोपक्रम राज्याला देणाºया महापालिकेच्या शिक्षकांनी यात आणखी एका संकल्पनेची भर टाकली आहे. यात १५ ते १६ शिक्षिकांचा सहभाग आहे. या शिक्षिका महिला, मुलींमध्ये ‘सॅनिटरी नॅपकीन’बाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
महिला सबलीकरणातून मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना सक्षम बनविण्यासाठी सर्व महिला शिक्षकांनी एकत्रित येऊन हा सामूहिक प्रयत्न केला आहे.
- उषा सरदेसाई, पर्यवेक्षिका,
महापालिकेच्या शिक्षण समिती, कोल्हापूर.
मासिक पाळीदरम्यान अधिक रक्तस्राव झाला तरीही तो शोषूण घेण्याची क्षमता सॅनिटरी नॅपकीनमध्ये असते. त्यामुळे कपड्यावर डाग पडत नाहीत आणि कोणतेही इन्फेक्शन होत नाही.
- डॉ. बबन पाटील
एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ, कोल्हापूर