गडहिंग्लज : कोरोनामुळे राज्यातील जनता आर्थिक अडचणीत सापडली आहे. अशा परिस्थितीतही या आर्थिक वर्षाच्या शेवटी गडहिंग्लजमधून तब्बल ४९ कोटींचा महसूल येथील जनतेने शासनाच्या तिजोरीत भरला आहे.गडहिंग्लज तालुक्यातील महावितरण विभागाने साडे चौदा कोटींचा महसूल जमा करून सर्व विभागात आघाडी घेतली आहे. यासाठी गडहिंग्लज विभागात थकबाकीमुक्तचे अभियानच राबविले जात आहे. याचा राज्याने आदर्श घेतला आहे.दुय्यम निबंधक कार्यालयाकडे होणाऱ्या खरेदी-विक्री दस्त नोंदणीमधून १३ कोटी तर महसूल विभागाच्या गौण खनीज व शेतसारामधून ७.५० कोटी वसुली झाली आहे. गडहिंग्लज नगरपालिकेनेही ५ कोटींचा महसूल गोळा करून ९० टक्के वसुली पूर्ण केली आहे. ग्रामपंचायत विभागानेदेखील तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतीकडील घरफाळा पाणीपट्टी कराचे सात कोटींची वसुली केली आहे. यासह पाटबंधारे विभागानेही एक कोटींपर्यंत मजल मारली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे दहा महिने व्यापार, व्यवसाय बंद होते. या काळात अनेकांचे रोजगार गेले. अनेक कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशा कठीण काळातही शासनाच्या विविध करांची रक्कम भरण्यात गडहिंग्लजकर आघाडीवर राहिले आहेत. मार्चअखेर वसुली पूर्ण करण्यासाठी सर्व विभाग झोकून कामाला लागतात. यावर्षी सर्वच विभागांपुढे वसुली पूर्ण होईल की नाही ? हा प्रश्न राहिला होता. परंतु, नागरिकांनीच चांगला प्रतिसाद दिल्यामुळे विभागांना याकामी यश मिळाले.
कोरोना काळातही गडहिंग्लजने दिला ४९ कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 7:00 PM
Tahasildar Gadhinglaj Kolhapur-कोरोनामुळे राज्यातील जनता आर्थिक अडचणीत सापडली आहे. अशा परिस्थितीतही या आर्थिक वर्षाच्या शेवटी गडहिंग्लजमधून तब्बल ४९ कोटींचा महसूल येथील जनतेने शासनाच्या तिजोरीत भरला आहे.
ठळक मुद्देकोरोना काळातही गडहिंग्लजने दिला ४९ कोटींचा महसूलकोरोना काळातही गडहिंग्लजने दिला ४९ कोटींचा महसूल