गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:01 AM2020-12-05T05:01:04+5:302020-12-05T05:01:04+5:30
गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव देवाचा जन्मोत्सव मंगळवारी (दि. ७) होत आहे. मात्र, ...
गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव देवाचा जन्मोत्सव मंगळवारी (दि. ७) होत आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा जन्मोत्सव मानकरी, गुरव, आदी ठरावीक लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असून, महाप्रसादही रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती देवस्थान गुरव समाजाने दिली.
-------------------------
२) गडहिंग्लजमध्ये आनंदोत्सव
गडहिंग्लज :
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व जयंत आसगावकर हे विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल, आघाडी सरकारची वर्षपूर्ती आणि पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आघाडीला राज्यात चार जागा मिळाल्याबद्दल गडहिंग्लज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील दसरा चौकात फटाके फोडून व साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, काँग्रेसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी, उदय जोशी, शर्मिली पोतदार, राजू जमादार, नगरसेवक हारुण सय्यद व रेश्मा कांबळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे महाविकास आघाडीतर्फे साखर-पेढे वाटप करण्यात आले. यावेळी उदय जोशी, सिद्धार्थ बन्ने, हारुण सय्यद, शर्मिली पोतदार, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०४१२२०२०-गड-०७