गडहिंग्लज : राज्यातील कृषी शिक्षणाच्या पदवी अभ्यासक्रमाची चौथ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित शिल्लक जागेवरील प्रवेश प्रक्रिया (स्पॉट अॅडमिशन) २६ ते २८ मार्च २०२१ तसेच व्यवस्थापन कोट्यातील जागांची प्रवेश प्रक्रिया २९ ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीमध्ये होणार आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या नजीकच्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नेसरी येथील रोशनबी शमनजी कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरचे संस्थापक-अध्यक्ष रियाज शमनजी यांनी केले आहे.
---------------------------
२) तंटामुक्त अध्यक्षपदी मोहिते यांची निवड
गडहिंग्लज : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील सूर्याजी मोहिते यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यापूर्वी त्यांनी सरपंचपदाचीही धुरा सांभाळली होती. त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
---------------------------
३) पाटणे येथे जागतिक जलदिन साजरा
चंदगड : पाटणे वनपरिक्षेत्रांतर्गत जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त वनकर्मचाऱ्यांनी गाळ, माती, पाळापाचोळा, अनावश्यक तण काढून वनक्षेत्रातील बंदिस्त पाणवठे श्रमदानातून पुनरूज्जीवित केले. दगडांच्या रचलेल्या बांधाची डागडुजी केली. त्यामुळे पाणी शुध्द होऊन साठवण क्षमता वाढली. त्यामुळे वन्यजीव, पक्षी यांची पाण्याची भटकंती नक्कीच थांबेल. प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी. आर. भांडकोळी, एन. एम. धमाणकर, वनरक्षक डी. एस. रावळेवाड, डी. ए. कदम, वनसेवक तुकाराम गुरव, मोहन तुपारे, पुंडलिक नागुर्डेकर, चंद्रकांत बांदेकर, विश्वनाथ नार्वेकर आदी उपस्थित होते.