गडहिंग्लज : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात लवकरच २०० बेडची सुविधा करणार आहोत.तसेच सिटी स्कॅन मशिनसह आणखी एक ऑक्सिजन प्लांट व अद्ययावत सोयी - सुविधा उपलब्ध करण्यात येतील. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील,अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनतर्फे येथील उपजिल्हा रुग्णालयाला २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आले.यावेळी पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे,प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्याहस्ते वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप आंबोळे व प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.चंद्रकांत खोत यांच्याकडे ऑक्सीजन कॉन्सट्रेटर सुपूर्द करण्यात आले. यावेळी नगरसेवक हारूण सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे, शहराध्यक्ष गुंड्या पाटील आदी उपस्थित होते.मुश्रीफ फौंडेशनचे आभार !ऑक्सिजन बेडची टंचाई लक्षात घेऊन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे सीपीआरसह जिल्ह्यातील कोवीड दवाखान्यांना १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स दिली आहेत. त्याबद्दल फाऊंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचे आभार तब्बल ७५ लाखांच्या या मशीन्समुळे रुग्णांची ऑक्सिजनसाठी होणारी हेळसांड थांबण्यास मदत होईल, असेजिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी यावेळी सांगितले.
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात लवकरच २०० बेडची सुविधा : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 6:56 PM
CoronaVIrus Kolhapur: गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात लवकरच २०० बेडची सुविधा करणार आहोत.तसेच सिटी स्कॅन मशिनसह आणखी एक ऑक्सिजन प्लांट व अद्ययावत सोयी - सुविधा उपलब्ध करण्यात येतील. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील,अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
ठळक मुद्देगडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात लवकरच २०० बेडची सुविधा : हसन मुश्रीफ सिटी स्कॅन मशिनसह आणखी एक ऑक्सिजन प्लांट व अद्ययावत सोयी - सुविधा करणार