मुरगूड - {कोल्हापूर} : - कागल तालुक्यातील यमगे गावामध्ये पसरलेली गस्ट्रो ची साथ अजूनही आटोक्यात आलेली नाही.विद्यानगर या परिसरात असणारी साथ आता संपूर्ण गावात पसरली असून चौथ्या दिवशी ८० रुग्ण बाधित झाले आहेत.विद्यानगर येथील टॉकी मधील आणि गावातील सर्व बोअरवेल तसेच मुख्य विहिरी मधील पाण्याचा अहवाल पिण्यास अयोग्य आला असून आता संपूर्ण गावात साथ पसरत असल्याने गावाला पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या सर पिराजीराव तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. यमगे विद्यानगर येथून मंगळवारी सुरू झाली गस्ट्रोची साथ आता संपूर्ण गावात पसरली आहे.चार दिवस झाले तरी साथीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही.ज्या ठिकाणाहून सुरू झाली तेथील उपचार झालेल्या रुग्णांना पुन्हा पुन्हा त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार करावे लागत आहे.साधारणता तीन दिवसांमध्ये या साथीवर नियंत्रण मिळवता येते पण चौथ्या दिवशी ही मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्याने अजून ही प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे.काही नागरिक मात्र होणाऱ्या उपचारावर समाधान व्यक्त करत नाहीत.तर काही जण थेट खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार करत आहेत. दरम्यान विद्यानगर येथील जुन्या टॉकी मधील,तसेच गावाला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या मुख्य विहिरी मधील तसेच गावातील सर्व बोअर वेल मधील पाण्याचे नमुने घेतले होते कोल्हापूर येथे ते तपासणी साठी पाठवले होते.त्याचा अहवाल प्राप्त झाला असून ते पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.पण आता संपूर्ण गावात ही साथ पसरल्याने गावाला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सर पिराजीराव तलावातील पाण्याकडे संशयाचे बोट दाखवले जात आहे.पण याच तलावातील पाणी मुरगूड आणि शिंदेवाडी या गावांना पिण्यासाठी दिले जाते पण ते फिल्टर होऊन जाते.त्यामुळे प्रशासनाने आता तलावातील पाण्याचे नमुने तपासणी साठी पाठवले आहेत.त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. पाणी उकळून पिण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.आज जिल्हा परिषदेचे सदस्य अंबरीश घाटगे,शिवानी भोसले यांनी भेट देऊन रुग्णांची चौकशी केली.