गडहिंग्लज : गडहिंग्लज फुटबॉल सिटी व केदारी रेडेकर फौंंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या गडहिंग्लज फुटबॉल लीग (जीएफएल) स्पर्धेत उपांत्य सामन्यात हाय-टेक आॅप्टेगन व जय-वरद स्पोर्टस् संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून अंतिम फेरीत धडक मारली. शहरातील एम. आर. हायस्कूल मैदानावर आज, बुधवारी दुपारी तीन वाजता अंतिम लढत होईल. पहिल्या उपांत्य सामन्यात हाय-टेक आॅप्टेगन व कळेकर फायटर्स यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. ट्रायबे्रकरमध्ये आॅप्टेगन संघाने फायटर्सवर १-३ ने विजय मिळविला. हाय-टेकच्या अनिकेत पोवार, मुकेश जरळीकर, महेश जगताप यांनी गोल केले, तर कळेकरकडून सूरज हाकिम याने एकमेव गोल केला.दुसऱ्या सामन्यात जय-वरदने साई रॉयल्स संघाचा १-० ने निसटता पराभव करून अंतिम फेरी गाठली. जय-वरदच्या पंकज संकपाळ याने ३० व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. ‘साई’कडून विकास जाधव, अमित निकम, आकाश पाथरवट यांनी उत्कृष्ट खेळ केला.दरम्यान, उपांत्य सामन्यापूर्वी मुंबईच्या आरसीएफ व गोव्याचा एफसी या दोन बलाढ्य संघांचा प्रेक्षणीय सामना झाला. चुरशीने झालेला हा सामना पूर्णवेळेत १-१ बरोबरीत राहिला. मात्र, ट्रायबे्रकरमध्ये गोव्याच्या संघाने मुंबई संघावर ४-५ ने मात करून सामना जिंकला. सामन्याचे उद्घाटन नावीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी दिग्दर्शक उमेश देवकर, उद्योजक सुनिल चौगुले, बाळासाहेब घुगरे, सुनील गुरव, अनिरुद्ध रेडेकर, महेश गाडवी आदींसह फुटबॉलप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जीएफएलचा अंतिम सामना आज
By admin | Published: April 22, 2015 12:44 AM