Dhananjay Mahadik: महाडिकांना संपवण्याची भाषा सोडा : धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 11:03 AM2021-04-26T11:03:48+5:302021-04-26T11:06:58+5:30
Dhananjay Mahadik GokulMilk Election Kolhapur : जिल्हा महाडिक मुक्त करण्याची भाषा काहीजण करीत आहेत.परंतु, महाडिकांनी इतके काय वाईट केले आहे? आजपर्यंत पाच निवडणुका लढवल्या, त्यातील एकच जिंकलो. चार वेळा हरलो म्हणजे काय मी संपलो नाही.जिंकणे- हरणे हा लढाईचा भाग आहे.लढाई करायचीच असेल तर तत्त्वांची करावी.महाडिकांना संपवण्याची भाषा सोडून द्यावी,या शब्दांत माजी खासदार धनंजय महाडीक यांनी नामोल्लेख टाळून पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.
नेसरी : जिल्हा महाडिक मुक्त करण्याची भाषा काहीजण करीत आहेत.परंतु, महाडिकांनी इतके काय वाईट केले आहे? आजपर्यंत पाच निवडणुका लढवल्या, त्यातील एकच जिंकलो. चार वेळा हरलो म्हणजे काय मी संपलो नाही.जिंकणे- हरणे हा लढाईचा भाग आहे.लढाई करायचीच असेल तर तत्त्वांची करावी.महाडिकांना संपवण्याची भाषा सोडून द्यावी,या शब्दांत माजी खासदार धनंजय महाडीक यांनी नामोल्लेख टाळून पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.
कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमू पाटील होते.माजी आमदार महादेवराव महाडिक व संजय घाटगे, जिल्हा बँकेचे माजी संचालक भैय्या कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शिवसेनेचे संग्राम कुपेकर व बाळ कुपेकर यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला.
महाडिक म्हणाले, 'गोकुळ'हा दूध उत्पादकांना ८२ टक्के परतावा देणारा आशिया खंडातील एकमेव संघ आहे. साडेपाच लाख दूध उत्पादकांना ह्यगोकुळह्णचा आधार आहे. भरमू पाटील म्हणाले, गोकुळची धुरा महाडिक व पी. एन. पाटील यांनी समर्थपणे सांभाळली आहे. बाळ कुपेकर म्हणाले, अखेरपर्यंत आपल्याला झुलवत ठेवून विरोधी आघाडीने आपल्यावर अन्याय केला. म्हणूनच सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी गडहिंग्लज कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, बी. एम. पाटील-वाघराळीकर, कृष्णराव वार्इंगडे, तानाजी पाटील, भरमाण्णा गावडा यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास उमेदवार सदानंद हत्तरकी, सम्राट महाडिक, रणजीतसिंह पाटील-मुरगुडकर, वसंत नंदनवाडे आदी उपस्थित होते.