उच्च न्यायालयातील गोकुळची याचिका पुन्हा फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 06:43 PM2021-04-09T18:43:21+5:302021-04-09T18:44:57+5:30

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ह्य गोकुळह्णची निवडणूक स्थगितीबाबत संघाशी संलग्न दोन संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल ...

Gokul's plea was again rejected by the High Court | उच्च न्यायालयातील गोकुळची याचिका पुन्हा फेटाळली

उच्च न्यायालयातील गोकुळची याचिका पुन्हा फेटाळली

googlenewsNext
ठळक मुद्देउच्च न्यायालयातील गोकुळची याचिका पुन्हा फेटाळली सर्वोच्च न्यायालयातील याचिका अद्याप सुनावणीविनाच

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ह्यगोकुळह्णचीनिवडणूक स्थगितीबाबत संघाशी संलग्न दोन संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका शुक्रवारी पुन्हा फेटाळण्यात आली. मात्र याबाबतची सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप सनावणीच झालेली नाही.

गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२० रोजी संपली आहे. कोरोनामुळे निवडणूक वर्षभर लांबणीवर गेली. तरीही सत्तारूढ गटाला अजूनही निवडणूक नको आहे. त्यामुळे निवडणूकीला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात दोन वेळा याचिका दाखल केली होती.

या दोन्ही याचिका न्यायालयात फेटाळून लावल्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मात्र त्यानंतर सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचबरोबर दोन दूध संस्थांनी उच्च न्यायालयत याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊन फेटाळण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही.

न्यायालयीन लढाईत सत्ताधारी अपयशी

गोकुळची निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी सत्तारूढ गटाने निकराचे प्रयत्न केले. मात्र न्यायालयीन लढाईत ते सध्या तरी अपयशी ठरले आहेत.

Web Title: Gokul's plea was again rejected by the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.