मराठा आरक्षण रद्द झाल्याने कोडोली येथे सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:26 AM2021-05-07T04:26:50+5:302021-05-07T04:26:50+5:30
कोडोली : मराठा आरक्षण रद्द झाल्याप्रकरणी आरक्षण मिळवण्यात राज्य शासन अपयशी झाल्याचा आरोप करीत सरकारसह विविध राजकीय ...
कोडोली :
मराठा आरक्षण रद्द झाल्याप्रकरणी आरक्षण मिळवण्यात राज्य शासन अपयशी झाल्याचा आरोप करीत सरकारसह विविध राजकीय पक्षांचा सकल मराठा समाजाच्या वतीने कोडोली येथील छत्रपती शिवाजी चौकात गुरुवारी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी निषेघ व्यक्त करीत घोषणाबाजी करण्यात आली. सारथी संस्थेला व अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी प्रत्येकी एक हजार कोटींची तरतूद करावी व त्यातील जाचक अटी रद्द करून तरुणांना सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा व्हावा. इतर समाजाप्रमाणे आरक्षणाचे फायदे देऊन शिक्षणासाठी शिष्यवृतीचा लाभ द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, जयदीप पाटील, विजय पाटील, सागर पाटील सातवे, अविनाश निकम सातवे, अमर पाटील, बाबा सुशाल हुजरे, आनंदा पाटील, सागर मोरे, प्रवीण जाधव, डॉ. अभिजित पाटील, निवास पाटील,
राहुल पाटील, अजिंक्य पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.