आजी - माजी विद्यार्थ्यांतर्फे कोल्हापुरात गुरुवारपासून राजाराम महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:26 PM2018-12-31T14:26:25+5:302018-12-31T14:28:35+5:30
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासह विचारांचे अदान - प्रदान करण्यासाठी राजाराम महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांच्यावतीने ३ ते ५ जानेवारी दरम्यान राजाराम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी शाहू छत्रपती यांच्या हस्ते या महोत्सवाचे आयोजन होणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एस. खेमनार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासह विचारांचे अदान - प्रदान करण्यासाठी राजाराम महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांच्यावतीने ३ ते ५ जानेवारी दरम्यान राजाराम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी शाहू छत्रपती यांच्या हस्ते या महोत्सवाचे आयोजन होणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एस. खेमनार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खेमणार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कला - गुणांना वाव देण्यासह त्यांना भावी आयुष्यात विविध गोष्टीची माहिती व्हावी, या उद्देशाने विविध मान्यवर व्यक्तीचे व्याख्यानही या दरम्यान होणार आहे. महोत्सवात जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, हिरवे बाजारचे पोपटराव पवार, दिग्दर्शक चंद्रकांत जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत. यासह आप्पासाहेब खोत यांचे कथा कथन, हर्षल जोशीचे एकपात्री प्रयोगाचे सादरकरण होणार आहे.
माजी जीएस शशिकांत पाटील म्हणाले, माजी विद्यार्थी व महाविद्यालय यांच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे. या दरम्यान महाविद्यालयात परिसरात सकाळी दहा ते सायंकाळी सात पर्यंत विविध फन गेम, आनंद बझार, खाद्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हेमंत पाटील म्हणाले, हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून ५डिसेंबर रोजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते समारोप होणार आहे. याप्रसंगी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण केले जाणार आहे.
प्रा. डॉ. अंजली पाटील ,प्रा. संजय पाझरे, प्रा. डॉ. अनिता बोडके, माजी जीएस जयदिप मोहिते, दिपक जेमेनीस, श्रीकांत सावंत,सुनिल धुमाळ, मिलींद दिक्षित, अविनाश मिरजकर,जब्बीन शेख, धनंजय चव्हाण, अर्पणा पाटील आदी उपस्थित होते.