शहिदांना अभिवादन, कोविड योद्ध्यांना सलाम,श्रद्धादीपांचे प्रज्वलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 10:46 AM2020-12-26T10:46:36+5:302020-12-26T10:49:08+5:30
Indian Army Kolhapur- श्रद्धादीप प्रज्वलन, देशभक्तिपर गीते, ह्यमशाल रॅलीह्ण अशा भावपूर्ण वातावरणात कोल्हापूरकरांनी शुक्रवारी शहिदांच्या स्मृतींना अभिवादन केले, तर कोविड योद्ध्यांना सलाम केला. वीर जवान अभिजित सूर्यवंशी यांचा २० वा स्मृतिदिन आणि जीवनमुक्ती सेवा संस्थेचा (व्हाईट आर्मी) २१व्या वर्धापनदिनानिमित्त शहीद दिन कार्यक्रम घेण्यात आला.
कोल्हापूर :श्रद्धादीप प्रज्वलन, देशभक्तिपर गीते, ह्यमशाल रॅलीह्ण अशा भावपूर्ण वातावरणात कोल्हापूरकरांनी शुक्रवारी शहिदांच्या स्मृतींना अभिवादन केले, तर कोविड योद्ध्यांना सलाम केला. वीर जवान अभिजित सूर्यवंशी यांचा २० वा स्मृतिदिन आणि जीवनमुक्ती सेवा संस्थेचा (व्हाईट आर्मी) २१व्या वर्धापनदिनानिमित्त शहीद दिन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात प्रारंभी वीर जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी सातच्या सुमारास ॲड. धनंजय पठाडे, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव, शाहीर राजू राऊत, व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल रॅलीचा प्रारंभ झाला.
बिंदू चौक, शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे रॅली पुन्हा बिंदू चौकात आली. त्यानंतर विद्यार्थी, नागरिकांच्या हस्ते दीड हजार श्रद्धादीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार, आदी कोविड योद्ध्यांना सलाम करण्यात आला. विनायक भाट, सुमित साबळे, प्रेम सातपुते, हिना यादवाड, डॉ. हर्षवर्धन जगताप, सिद्धेश पाटील, प्रशांत शेंडे, आदी कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जयेश ओसवाल, हर्षेल सुर्वे, शाहीर दिलीप सावंत, ऐश्वर्या मुनीश्वर, प्रकाश गाताडे, डॉ. अंजना जाधव, अरविंद देशपांडे, अजित सातपुते, विजया रोकडे, कस्तुरी, राजेश्वरी आणि शर्वरी रोकडे, चंद्रहार पाटील, डॉ. शीतल पाटील, बंडा साळोखे, आदी उपस्थित होते. प्रकाश सुतार यांनी सूत्रसंचालन केले.
कोविड योद्धा संदेश
या कार्यक्रमात श्रद्धादीप प्रज्वलित करून ह्यकोविड योद्धाह्ण असा संदेश देण्यात आला. शाहीर राजू राऊत यांनी ऐतिहासिक बिंदू चौकाच्या तटबंदीची महती सांगितली. राजेंद्र कोरे, सागर मौर्य, अमरसिंह संघर्षे यांनी सादर केलेल्या कर चले हम फिदा, मेरा कर्मा तू..., भारत हमको जानसे प्यारा है, आदी देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमला.