गटविकास अधिकारी उर्मटपणे उत्तर देत असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:49 PM2020-02-13T18:49:48+5:302020-02-13T18:51:05+5:30

या प्रकरणाने संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधींनी गटविकास अधिकाऱ्यांना आज गुरुवारी धारेवर धरले. अनेकदा जोरदार वादावादी झाली तरी गटविकास अधिकारी उर्मटपणे उत्तर देत असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी संतप्त झाले.

Group Development Officer | गटविकास अधिकारी उर्मटपणे उत्तर देत असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी संतप्त

गटविकास अधिकारी आणि पदाधिकारीयांच्यातील खंडाजंगीचा क्षण

googlenewsNext
ठळक मुद्देलोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली व आपलाच ठेका धरला.  

गारगोटी - बुधवारी पंचायत समिती भुदरगडमध्ये  सभापतीना शिरस्ता ( प्रोटोकॉल) शिकवण्याचा प्रयत्न करत गटविकास अधिकारी माधुरी परीट यांनी अवमान केला होता. या प्रकरणाने संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधींनी गटविकास अधिकाऱ्यांना आज गुरुवारी धारेवर धरले. अनेकदा जोरदार वादावादी झाली तरी गटविकास अधिकारी उर्मटपणे उत्तर देत असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी संतप्त झाले.
          गटविकास अधिकारी माधुरी परीट यांनी प्रकल्प संचालक अजय माने यांच्या समोर सभापतींशी उर्मट वर्तन करून त्यांचा अपमान केल्याची माहिती सर्वत्र पसरली होती. आज सभापती दालनात सभापती किर्ती देसाई उपसभापती सुनील निंबाळकर माजी उपसभापती अजित देसाई,सरिता वरंडेकर अन्य सदस्य व कार्यकर्ते उपस्थित झाले.       
          यादरम्यान गटविकास अधिकारी माधुरी परीट बारा वाजेपर्यंत कार्यालयात आल्या नव्हत्या. सभापतींनी सर्व विभागाची माहिती करून घेतली यावेळी बरेचसे कर्मचारी हजर नव्हते. बारा वाजता गटविकास अधिकारी कार्यालयात आल्या. त्यांना सभापती दालनात बोलावण्यात आले उपस्थित लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली व आपलाच ठेका धरला.  त्या उठून गेल्या यानंतर सर्वजण उठून गटविकास अधिकार्‍यांच्या दालनात गेले तेथे जाऊन त्यांना त्याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण तेथेही त्यानी आपला ठेका सोडला नाही. गटविकास अधिकारी खुर्चीत बसून होत्या तर सर्व पदाधिकारी उभे राहूनच बोलत होते. त्यांच्या हा उर्मटपणा पाहून सर्वजण अवाक झाले.
  सभापतींनी सर्व विभागाची माहिती करून घेतली यावेळी बरेचसे कर्मचारी हजर नव्हते. बारा वाजता गटविकास अधिकारी कार्यालयात आल्या. त्यांना सभापती दालनात बोलावण्यात आले उपस्थित लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली व आपलाच ठेका धरला. 


 

Web Title: Group Development Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.