श्री जोतिर्लिंग मंदिराच्या भक्त निवासासाठी पालकमंत्र्यांनी दिला २५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:29 AM2021-08-13T04:29:19+5:302021-08-13T04:29:19+5:30

गारगोटी येथील ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग मंदिराच्या भक्त निवासासाठी जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्री सतेज पाटील यांनी २५ लाख रुपयांचा निधी ...

The Guardian Minister gave a fund of Rs. 25 lakhs for the accommodation of devotees of Shri Jotirlinga Mandir | श्री जोतिर्लिंग मंदिराच्या भक्त निवासासाठी पालकमंत्र्यांनी दिला २५ लाखांचा निधी

श्री जोतिर्लिंग मंदिराच्या भक्त निवासासाठी पालकमंत्र्यांनी दिला २५ लाखांचा निधी

Next

गारगोटी येथील ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग मंदिराच्या भक्त निवासासाठी जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्री सतेज पाटील यांनी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे.

गारगोटी गावचे ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीसह विविध निधीतून सुरू असून या कामासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सहकार्य करावे, अशी मागणी ग्रामस्थांची केली होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष असताना डॉ. डी. वाय. पाटील यांनी गारगोटीतील श्री मुळे महाराज मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री कृष्णमकाका मंदिरांच्या उभारणीसाठी मोठा हातभार लावला आहे. तोच स्नेह श्री मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष मंत्री सतेज पाटील यांनी कायम ठेवला आहे.

Web Title: The Guardian Minister gave a fund of Rs. 25 lakhs for the accommodation of devotees of Shri Jotirlinga Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.