अनिल कुराडे यांना गुरुगौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:26 AM2020-12-06T04:26:11+5:302020-12-06T04:26:11+5:30
कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील कॅप्टन आबा पाटील फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक पुरस्काराने येथील शिवराज विद्या संकुलाचे ...
कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील कॅप्टन आबा पाटील फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक पुरस्काराने येथील शिवराज विद्या संकुलाचे सचिव प्रा. अनिल कुराडे यांना सन्मानित करण्यात आले.
येथील शिवराज महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला. फाऊंडेशनच्या अध्यक्षा शारदादेवी पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन प्रा. कुराडे यांचा गौरव झाला. प्रा. पी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते.
कार्यक्रमास प्राचार्या बीणादेवी कुराडे, तानाजी चौगुले, सदानंद पाटील, संतोष शहापूरकर, विजय पाटील, विक्रम शिंदे, आझाद पटेल, आदींसह सर्व विभागप्रमुख, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
फाऊंडेशनचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविकात फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. संतोष पाटील यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. रंगराव हेंडगे यांनी आभार मानले.
-------
चौकट
*महिन्याचा पगार फाऊंडेशनला..!
प्रा. कुराडे यांनी कॅ. पाटील फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी उपक्रमासाठी आपल्या एक महिन्याच्या पगाराचा धनादेश फाऊंडेशनचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांच्याकडे व्यासपीठावरच सुपूर्द केला.
----
फोटो ओळी -
गडहिंग्लज येथे शिवराज विद्यासंकुलाचे सचिव प्रा. अनिल कुराडे यांना शारदादेवी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्राचार्य एस. एम. कदम, बाळासाहेब पाटील, बीणादेवी कुराडे, पी. डी. पाटील, आदी उपस्थित होते.