येथील एका माजी ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करून जनावरांचा गोठा बांधला होता तर याच जागेवर एका गुरूजीनेही जागेवर अतिक्रमण केला होता. या गुरूजींनी सदरचा गोठा सरकारी जागेवर बांधला असून तो निष्कासित करावे याकरिता ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केले होते. या तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायतीने सरकारी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावे, याकरिता संबधित अतिक्रमणधारकांस नोटीस बजावल होती तर गुरुजीने केलेले अतिक्रमण हटवा मगच आमचे अतिक्रमण काढा, अशी भूमिका घेतल्याने वाद वाढला. अतिक्रमण हटवावे यासाठी आक्रमक झालेल्या गुरुजींनी नम्रतापूर्वक सदरचे अतिक्रमण काढून घेत अस लयाचे सांगताच या वादावर पडदा पडला पण मूळ अतिक्रमणधारकांने अतिक्रमण हटविण्यास काकू करताच ग्रामपंचायत कर्मचारी अतिक्रमण हटविण्यास जाताच सदरचे अतिक्रमण स्वत:हून हटवत असल्याचे सांगताच पुढील कारवाई थांबविले. ग्रामपंचायतीने अतिक्रमणधारकाविरुद्ध घेतलेले या कारवाईचे नागरिकांच्यातून जोरदार स्वागत होत आहे.
येथील बऱ्याच नागरिकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. एका माजी सदस्याने शासकीय जागेवर अतिक्रमण केले असून तर एका कार्यकर्त्याने मुख्य रस्त्यावर जनावरांचा गोठा थाटला आहे.