रॉबिन कुकरेजा, दीपक मोटवानी, सुमित तनवानी यांनी बांधलेल्या अवैद्य बांधकामांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत बांधलेली बांधकामे जेसीबीच्या साह्याने पाडली. तावडे हॉटेल ते रुकडी बंधारा या जिल्हा मार्ग क्रमांक २० वर अतिक्रमणे वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने १० मे २०१९ रोजी या रस्त्याच्या मध्यापासून 47४७ मीटर अंतरातील जुन्या व नवीन बांधकामांना जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले. त्या आदेशाची पायमल्ली करत वरील तीन जणांनी बांधकामे सुरूच ठेवली होती. या बांधकामधारकांना वेळोवेळी नोटिसा देऊनही बांधकामे सुरूच ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कारवाईत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक संजय माळी, शिवाजी वावरे, शिवाजी पाटील, अनिल पाटील, मधू पाटील यांचा सहभाग होता.
कोट : गांधीनगर मुख्य रस्त्याच्या मध्यापासून ४७ मीटर अंतरातील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून बांधकामे सुरू ठेवल्यास ती पाडण्याची मोहीम अशीच पुढील काळात राबवण्यात येणार आहे. -शिवाजी इंगवले, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
फोटो : ३० गांधीनगर कारवाई
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून गांधीनगर मुख्य रस्त्यालगत सुरू असणाऱ्या विनापरवाना बांधकामांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने कारवाई केली. या वेळी शाखा अभियंता शिवाजी इंगवले व इतर कर्मचारी.