शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

हापूस आंब्याची पेटी तीन हजारांत

By admin | Published: February 09, 2015 12:14 AM

भाज्यांच्या दरात घसरण : गवारी प्रतिकिलो ८० रुपये; कच्ची कैरी अन् द्राक्षांची आवक वाढली

कोल्हापूर : शहरातील बाजारात रविवारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आल्याने दरात घसरण झाली आहे; तर इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे, आंबा व हापूस आंब्याची आवक कोल्हापूर बाजार समितीत आली आहे, पण प्रत्यक्षात बाजारात हापूस आंबा दाखल झालेला नाही. आंब्याच्या एका पेटीचा दर तीन हजार रुपये आहे. लोणचे, गुळांबा व करम यांसाठी लागणारी कच्ची कैरी बाजारात दाखल झाली. कच्च्या कैरीचा दर (एक नग) २० रुपये होता. एकंदरीत, भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असल्याचे चित्र होते. शहरातील सर्व बाजारपेठांत रविवारी द्राक्षे (थॉमसन, सोनाका प्रकार) व काळी द्राक्षे, वाटाणा शेंगा यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. सोनामाचा दर ८० ते शंभर रुपये, थॉमसनचा दर ५० ते ६० रुपये असा प्रतिकिलो होता. वाटाण्याच्या शेंगांचा दर प्रतिकिलो ४० रुपये असा होता. कोथिंबीर, मेथी, पोकळा यांचे दर स्थिर आहेत. प्रतिकिलो गवारी आता ८० रुपये झाली आहे. गतआठवड्यापेक्षा गवारीचा दर दहा रुपयांनी कमी झाला आहे. मात्र, ओला वाटाणा ३५ रुपये झाला आहे. त्यात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. मोसंबी, माल्टाचे दर घसरले. या आठवड्यात मोसंबी ६५० रुपये (चुमडे), २५० रुपये (चुमडे) आहे, तर चिक्कू, पेरू, सफरचंद, अननस, कलिंगडे, बोरे, पपई, केळी (वसई), कवठ, स्ट्रॉबेरी यांची आवक वाढली आहे; पण दर स्थिर आहेत.गुळाच्या दरात वाढबाजारात गुळाची (रवे)आवक कमी झाल्याने दरामध्ये शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. गुळाचा सरासरी दर आता ३२२५ रुपये झाला आहे. याचे कारण गुऱ्हाळ कमी झाल्याचे गूळ व्यावसायिकांनी सांगितले. सध्या किरकोळ बाजारात गूळ प्रतिकिलो ३५ रुपयांपासून ते ३७ रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, गत चार महिन्यांतील गुळाच्या दरात झालेली ही पहिली वाढ आहे. यापूर्वी गुळाचा दर स्थिर होता.डाळींच्या दरात तब्बल आठ रुपयांनी वाढगत आठवड्यात बाजारात हरभराडाळ ४० रुपये प्रतिकिलो होती. ती आता ४८ रुपये, तूरडाळ ८२ रुपयांवरून ९० रुपये झाली. साखर २८ ते ३० रुपये, मूगडाळ १२० रुपये, मूग व मटकी शंभर रुपये, तीळ १६० रुपये, तर सरकी ७२ रुपये आहे. या सर्वांचे दर स्थिर आहेत.तासगाव, मिरज, सांगली, कागल या भागांमधून द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत द्राक्षांचे दर कमी झाले आहेत.- शरद जगदने, फळविक्रेते, कोल्हापूर.कांदा, लसूण तेजीतघाऊक बाजारात कांद्याच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. दहा किलोंचा सरासरी दर १३० रुपये, तर लसणाचा दर ४०० रुपये झाला आहे. कांदा व लसूण यांशिवाय जेवणाला पूर्णत्वच येत नाही; त्यामुळे जेवणामध्ये त्याचा सर्रास वापर असतो. त्यामुळे यांची मागणी स्थिरच असते.