Har Ghar Tiranga: ये जुनून है... कृष्णा नदीत ९ किलोमीटर पुरातून पोहत फडकविला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 04:06 PM2022-08-14T16:06:45+5:302022-08-14T16:07:15+5:30

Har Ghar Tiranga: कृष्णामाई जलतरण मंडळाचा पुढाका, हरिपूर ते उदगावचा प्रवास

Har Ghar Tiranga: Yeh Junoon Hai... swam through 9 km flood in Krishna river and hoisted the tricolor in kolhapur | Har Ghar Tiranga: ये जुनून है... कृष्णा नदीत ९ किलोमीटर पुरातून पोहत फडकविला तिरंगा

Har Ghar Tiranga: ये जुनून है... कृष्णा नदीत ९ किलोमीटर पुरातून पोहत फडकविला तिरंगा

Next

कोल्हापूर/ उदगाव : आझादीचा अमृत महोत्सव कृष्णामाई जलतरण मंडळाच्या सदस्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. अमृत महोत्सव निमित्ताने
आज १४ ऑगस्ट रोजी आझादीच्या अमृतमहोत्सवी निमित्त हातात तिरंगा ध्वज घेऊन मंडळातील सदस्यांनी  हरिपूर (ता.मिरज )येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमापासून ते उदगाव ता.शिरोळ येथील कृष्णाघाट पर्यत तब्बल ९ किलोमीटरचे अंतर १ तास १० मिनिटांमध्ये महापुरातून साहसी जलप्रवास पूर्ण करण्यात आले. यामध्ये मंडळाच्या २२ जणांचा समावेश होता.

‌उदगाव (ता.शिरोळ) येथील कृष्णमाई जलतरण मंडळातर्फे अनेक विधायक कामे हाती घेतलेली आहेत. कृष्णाघाट वरील स्वच्छता, ब्रिटीश कालीन पुलावरील दगडी बांधकामातील अनावश्यक झाडे तोडणे, पर्यावरण स्वच्छ ठेवणे तसेच असंख्य मुलामुलींना मोफत पोहण्यास शिकवणे तसेच हरिपूर ते उदगाव कृष्णाघाट व कृष्णाघाट उदगाव ते मिरज असा जवळपास २० किलोमीटर अंतराचा साहसी जलप्रवासाच्या स्पर्धा आयोजित करणे इत्यादी उपक्रम राबवून साहसी शालेय मुला मुलींना प्रोत्साहनपर बक्षिसे देवून गौरविणे अशी अनेक कामे केली जात आहेत. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा घालून ७०० ते ८०० लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करणे तसेच मे महिन्यामध्ये बालवाडी पासून ते कॉलेजच्या विध्यार्थी साठी पोहण्याच्या स्पर्धा आयोजित केली जातात.

तर सद्या ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन देश साजरा करीत आहे. या पार्श्वभूमीवर उदगाव येथील कृष्णमाई जलतरण मंडळानेही ९ किलोमीटर अंतरावर हातात तिरंगा घेऊन पोहत येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी पहाटे या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये राजू कलगुटगी, प्रा.सुनिल बनहट्टी, जयपाल मगदूम, गणेश पाचंगे, नितीन पाटील,तानाजी जाधव,महेश महाडिक, ऋषभ पाटील,विक्रम घाटगे, संतोष चुडाप्पा, कोळेकर अण्णा,बाळासो चौगुले तसेच मंडळाचे अनेक सदस्यांनी पुढाकार घेऊन पोहत तिरंगा फडकवत हरिपूर पासून उदगाव पर्यत आणण्यात आला. हा उपक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Har Ghar Tiranga: Yeh Junoon Hai... swam through 9 km flood in Krishna river and hoisted the tricolor in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.