हसन मुश्रीफ यांच्या भगिनी हिबजाबी मुजावर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:25 AM2021-05-11T04:25:05+5:302021-05-11T04:25:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांच्या ज्येष्ठ भगिनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांच्या ज्येष्ठ भगिनी हिबजाबी बाबासाहेब मुजावर (वय ७८,रा. कोल्हापूर) यांचे शनिवारी निधन झाले. कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बॉडीबिल्डर व बाबूजमाल दर्ग्याचे मुजावर स्वर्गीय बाबासाहेब मुजावर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात नातू, सून, तीन मुली असा परिवार आहे.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या ज्येष्ठ बहिणीच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त करून कोविडच्या पहिली व दुसऱ्या लाटेत ज्येष्ठ बहीण, लहान बहिणीचे पती (मेहुणे), भाचीचा पती, मामाचा मुलगा (मिरज) यांना गमावल्याबाबत दुःख व्यक्त केले आहे. दुसरी लाट ही भयंकर असून कृपया कोणीही सांत्वनासाठी येऊ नये. अत्यावश्यक काम असलेस फोनवरून बोलावे व लाॅकडाऊन उठल्यानंतर भेटूया. घरी रहा, सुरक्षित राहा. कोविडची लक्षणे आढळल्यास विनाविलंब तपासणी करून घ्यावी व पुढील उपचारासाठी माझी मदत घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
सुरेखा पाटील
(फोटो-१००५२०२१-कोल-सुरेखा पाटील निधन)
कोल्हापूर : पाचगाव येथील सुरेखा विरणगोंडा पाटील (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून असा परिवार आहे. ॲड. वैभव पाटील यांच्या त्या आई होत.