कर्नाटकातील उद्योग विस्तारासाठी ‘घोडावत ग्रुप’ला आवश्यक ती मदत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:29 AM2021-09-04T04:29:13+5:302021-09-04T04:29:13+5:30
उद्योगपती घोडावत यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी महेंद्रभाई सिंघी, गौतम गेलेच्छा, विमल रुणवाल उपस्थित ...
उद्योगपती घोडावत यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी महेंद्रभाई सिंघी, गौतम गेलेच्छा, विमल रुणवाल उपस्थित होते. घोडावत ग्रुपने गेल्या दोन वर्षांपासून राजधानी बेंगलोर, बेळगाव, गुलबर्गा, हुबळी येथून ‘स्टार एअर’ विमानसेवा सुरू केली. या सेवेला लागणारा मेंटेनन्स विभाग बेंगलोर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावर सुरू केला आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीसह परकीय चलनही राज्य शासनाला मिळणार आहे. त्याबाबत मुख्यमंत्री बोम्मई यांनी ‘स्टार एअर’मुळे कर्नाटकमधील उद्योगवाढीस गती मिळाली आहे. घोडावत यांनी उद्योगाच्या माध्यमातून कर्नाटकमधील अनेक गरजूंना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. घोडावत यांनी शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. विद्यापीठाला सदिच्छा भेट देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
चौकट
कर्नाटकचे भाग्य
बोम्मई यांच्या रूपाने प्रामाणिक, कार्यतत्पर, अभ्यासू, संयमी, जनतेविषयी व विशेषतः शेतकऱ्यांविषयी तळमळ असणारे मुख्यमंत्री लाभले, हे कर्नाटकचे भाग्य आहे. त्यांनी कडक निर्बध घालून कर्नाटकला कोरोनामुक्तीकडे नेले. ‘स्टार एअर’च्या माध्यमातून आम्ही कर्नाटकातील मुख्य शहरे भारतातील मुख्य शहरांशी लवकरच जोडणार असल्याचे उद्योगपती घोडावत यांनी सांगितले.
फोटो (०३०९२०२१-कोल-संजय घोडावत (हुबळी) : हुबळी येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची उद्योगपती संजय घोडावत यांनी भेट घेऊन उद्योगविस्तारासह विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी महेंद्रभाई सिंघी, विमल रूणवाल, गौतम गेलेच्छा उपस्थित होते.
030921\03kol_2_03092021_5.jpg
फोटो (०३०९२०२१-कोल-संजय घोडावत (हुबळी) : हुबळी येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची उद्योगपती संजय घोडावत यांनी भेट घेवून उद्योगविस्तारासह विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी महेंद्रभाई सिंघी, विमल रूणवाल, गौतम गेलेच्छा उपस्थित होते.