वंचित ५५ कुटुंबांना व्यवसायासाठी मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:26 AM2020-12-06T04:26:06+5:302020-12-06T04:26:06+5:30
एक दिवसाची कावेरी जातीची हजार पिल्ली चांदोली येथील स्वरूप शेट्ये, परळेनिनाईमधील आनंदा चौगुले व न्यू राजापूर येथील वैशाली डोंगरे ...
एक दिवसाची कावेरी जातीची हजार पिल्ली चांदोली येथील स्वरूप शेट्ये, परळेनिनाईमधील आनंदा चौगुले व न्यू राजापूर येथील वैशाली डोंगरे यांना कमवा व शिका योजनेतून बावीस दिवस पिल्ली वाढविण्याचा व्यवसाय दिला. त्यासाठी त्यांना संगोपन, लसीकरण व खाद्य निर्मितीबाबत प्रशिक्षण दिले. बावीस दिवसांची ही पिल्ली गोठणे अभयारण्यग्रस्तांना,परळेनिनाईतील धरणग्रस्तांना, तर बोरमाळ, हुंबवली, घोळसवडे, चांदोली धनगरवाडा, न्यू राजापूर (ता. हातकणंगले) येथील गरजू महिलांना मोफत वाटून, सोबत खाद्य व संगोपनाची माहिती दिली.
कोविड काळात अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना छोट्या व्यवसायासाठी आधार मिळाला आहे. अडीच महिन्यांनी कोंबडी विक्रीयोग्य होऊन त्यातून चार लाखांपर्यंत व्यावसाय होईल, असे फाऊंडेशनच्या विश्वस्त कांचनताई परूळेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी किर्लोस्कर कंपनीचे परिसर विकास अधिकारी शरद आजगेकर, तज्ज्ञ मार्गदर्शक वैजयंती पाटील, तन्वी कुडाळकर, शेतकरी गटाचे अध्यक्ष अजिंक्य बेर्डे उपस्थित होते.