महामार्गावरील नागरिकांसाठी मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:24 AM2021-07-29T04:24:12+5:302021-07-29T04:24:12+5:30
कोल्हापूर : मागील आठवड्यात आलेल्या महापुरामुळे महामार्गावर अडकलेल्या नागरिकांसाठी रॉबिन हुड आर्मीच्या वतीने नाष्टा, जेवण व पिण्याच्या पाण्याची सोय ...
कोल्हापूर : मागील आठवड्यात आलेल्या महापुरामुळे महामार्गावर अडकलेल्या नागरिकांसाठी रॉबिन हुड आर्मीच्या वतीने नाष्टा, जेवण व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. तसेच टोप येथील शहीद भगतसिंग ग्रुपच्या वतीने चहा बिस्किटे देण्यात आली यासह अन्य सामाजिक संस्था व मंडळांनी नाष्टा जेवणाची सोय केली.
कोल्हापुरात घराघरात पाणी शिरलेले असताना तिकटे महामार्गावर हजारो वाहने पुरामुळे अडकून पडली होती. यात कित्येक प्रवासी, वाहन चालक होते. त्यांच्यासाठी रॉबिन हुड आर्मीच्या स्वयंसेवकांनी जेवणाची २५०० पॅकेट, पाण्याचे २ हजार बॉटल, बिस्किटांची ४ हजार पुडे असे खाद्यपदार्थ पोहोचविण्यात आले. अनेक लोकांची नाष्ट्यापासून जेवणा-पाण्यापर्यंतची सोय करण्यात आली. आता पूर बाधित गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे किट पाठवण्याचे नियोजन सुरू आहे. ह्या कार्यात हॉटेल रजत, ओविराज वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड व दानशूर व्यक्तींचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी टोपचे उपसरपंच राजू कोळी, सुशांत कोळी, सुरज कोळी, हेमंत कोळी, प्रभांजन कोळी, निखिल पाटील, प्रेम कोळी, तुषार कोळी, तनिष्क कोळी यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
--