कोरोनाविरोधी लढाईसाठी वडणगेत मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:16 AM2021-06-21T04:16:56+5:302021-06-21T04:16:56+5:30

कोरोनाच्या लढाईत फ्रंटफुटवर काम करणाऱ्या सरपंच सचिन चौगले व बी. एच. दादा युवा मंच यांच्या रुग्णवाहिकेसाठी आर्थिक मदत देण्यात ...

A helping hand in the fight against the Corona | कोरोनाविरोधी लढाईसाठी वडणगेत मदतीचा हात

कोरोनाविरोधी लढाईसाठी वडणगेत मदतीचा हात

Next

कोरोनाच्या लढाईत फ्रंटफुटवर काम करणाऱ्या सरपंच सचिन चौगले व बी. एच. दादा युवा मंच यांच्या रुग्णवाहिकेसाठी आर्थिक मदत देण्यात आली. तसेच प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि सेंट झेवियर्स हायस्कूल २००६ च्या बॅचच्या वतीने सत्यव्रत जामसांडेकर यांनी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर कोविड अलगीकरण केंद्रास भेट दिला.

यावेळी माजी सरपंच प्रकाश चौगले, राजेंद्र चौगले, पिराजी मेथे, युवा नेते रवींद्र पाटील, के. डी. सावंत, शंकर व्हरगे, प्रकाश उदाळे, ॲड. संजय जाधव, प्रवीण चौगले, मदन चौगले, धनाजी चौगले, सागर लांडगे, श्रीकांत चव्हाण, किरण उलपे, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, शिव साई लोककल्याण फौंडेशन, कणेरीवाडी यांच्या माध्यमातून अलगीकरण केंद्राला ऑक्सिमीटरसह ४० हजार रुपयांची औषधे देण्यात आली.

यावेळी वडणगे सेवा संस्थेचे सभापती सुनील लांडगे, माजी उपसरपंच सतीश पाटील, दीपक व्हरगे, उत्तम कदम, कृष्णात चव्हाण, अजित पोवार, बर्ची मिसाळ, फौंडेशनचे सुरेश कदम, आबा शेळके, शिवा पसारे, रणजित भोसले व नागरिक उपस्थित होते.

फोटो आहे.

वडणगे, ता. करवीर येथील अलगीकरण कक्षासाठी बी. एच. पाटील यांच्याकडे मदत सुपूर्द करताना शंकर व्हरगे. सोबत सरपंच सचिन चौगले, रवींद्र पाटील, प्रकाश चौगले, के.डी. सावंत. राजेंद्र चौगले, प्रकाश उदाळे आदी.

Web Title: A helping hand in the fight against the Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.