माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा परिषदेसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:24 AM2021-09-25T04:24:23+5:302021-09-25T04:24:23+5:30

कोल्हापूर : माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे धरण्यात ...

Holding in front of Zilla Parishad on behalf of Secondary Teachers Association | माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा परिषदेसमोर धरणे

माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा परिषदेसमोर धरणे

Next

कोल्हापूर : माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे धरण्यात आले. माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबेकर यांना मागण्यांचे निवदेन देण्यात आले.

कोरोना योद्धा म्हणून काम केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवेची नोंद सेवापुस्तिकेत करण्यात यावी, मृत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा खाली कायम नोकरी देण्यात येऊन शासकीय आर्थिक लाभ मिळावेत, शिक्षक व शिक्षकेतर यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन २०१९, अंशदायी परिभाषित निवृत्तीवेतनऐवजी भविष्य निर्वाह व सेवानिवृत्ती योजना लागू करण्यात यावी, १ नोव्हेंबर २००५ पासून त्यांच्या खात्यावरील जमा रक्कम प्रॉव्हिडंड फंड खाते काढून त्यामध्ये आरंभीची शिल्लक म्हणून वर्ग करण्यात यावी, प्रस्तावित संचमान्यता दुरुस्ती प्रस्ताव दुरुस्त करून मिळावा, वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ कोणत्याही अटीविना मिळावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यावेळी राज्य समन्वयक बी. डी. पाटील, अध्यक्ष बी. एस. खामकर, कार्यवाह सुरेश खोत, उपाध्यक्ष रवी देसाई, अनिल चव्हाण, संजय चोरमारे, जयसिंग देवकर, सुरेश जत्राटकर, पी. आर. पाटील, प्रशांत चोपडे, सचिन बिडकर, विजय पाटील, सहदेव केंगळे, बी. बी. चिंदगे, ए. पी. पलंगे, पी. एस. चाटे, एस. बी. पाटील उपस्थित होते.

Web Title: Holding in front of Zilla Parishad on behalf of Secondary Teachers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.