‘भारत अगेन्स्ट’ची करवीर तहसील कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:15 AM2020-01-23T11:15:01+5:302020-01-23T11:16:25+5:30

करवीर तहसील कार्यालयातील अनागोेंदी कारभाराविरोधात ‘भारत अगेन्स्ट करप्शन’ या संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

Holding the Karvir tahsil office of 'India Against' | ‘भारत अगेन्स्ट’ची करवीर तहसील कार्यालयासमोर धरणे

तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभाराविरोधात ‘भारत अगेन्स्ट संघटने’च्या वतीने करवीर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्दे‘भारत अगेन्स्ट’ची करवीर तहसील कार्यालयासमोर धरणे संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : करवीर तहसील कार्यालयातील अनागोेंदी कारभाराविरोधात ‘भारत अगेन्स्ट करप्शन’ या संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून श्रावणबाळ, निराधार, संजय गांधी, दिव्यांग, आदी योजनांच्या कागदपूर्ततेबाबत तसेच रेशनकार्ड काढण्याबाबत भरमसाट लूट करत आहेत; त्यामुळे रेशनकार्डची सर्व कामे ही तहसील कार्यालयाकडून केली जावीत.

करवीर तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी अधिकारी व कर्मचारी उद्धट बोलून कामे प्रलंबित ठेवतात, यामध्ये सुधारणा व्हावी, तहसील कार्यालयातील कारभार हा पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त करावा, या मागण्यांसाठी ‘भारत अगेन्स्ट करप्शन’ संघटनेच्या वतीने करवीर तहसील कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले.

यामध्ये संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष बिसुरे, जिल्हाध्यक्ष शरद सोनुर्ले, राजू कुंभार, कृष्णा लोकरे, रवींद्र तांबे, पांडुरंग धुमाळ, दशरथ नंगीवाले, नम्रता पाटील, आदींचा समावेश होता.

 

 

Web Title: Holding the Karvir tahsil office of 'India Against'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.