होमिओपॅथी दवाखाना, ब्लड बँकेत लसीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:23 AM2021-05-01T04:23:51+5:302021-05-01T04:23:51+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्र व ब्लड बँकेमध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी माजी नगरसेवक ईश्वर परमार ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्र व ब्लड बँकेमध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी शुक्रवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. सध्या महानगरपालिकेमार्फत विविध आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत; परंतु ही केंद्रे अपुरी पडत आहेत. वाढत्या गर्दीमुळे वारंवार सर्व आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी महापालिका कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. याबाबत तात्काळ विचार होऊन लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे अत्यावश्यक आहे. बिंदू चौक या लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या भागात भाऊसिंगजी रोडवरील राजर्षी छत्रपती शाहू होमिओपॅथिक दवाखाना येथे, तसेच महाद्वार रोडवरील कसबा गेट परिसरात असणारे लक्ष्मीबाई जाधव ब्लड बँकेमध्ये तातडीने लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी परमार यांनी केली आहे.