होनेवाडी ग्रामपंचायतीची सलग पाचव्यांदा निवडणूक बिनविरोध होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 12:34 PM2020-12-29T12:34:54+5:302020-12-29T12:37:45+5:30
gram panchayat Elecation- आजरा तालुक्यातील होनेवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध होणार आहे. ग्रामस्थांनी निवडणूकऐवजी गावच्या विकासासाठी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. सुकाणू समितीने दिलेल्या निर्णयाप्रमाणे फक्त सात जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करणेत आले.
आजरा :आजरा तालुक्यातील होनेवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध होणार आहे. ग्रामस्थांनी निवडणूकऐवजी गावच्या विकासासाठी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. सुकाणू समितीने दिलेल्या निर्णयाप्रमाणे फक्त सात जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करणेत आले.
सरकारी लाभाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबविलेले होनेवाडी गाव. १९९५ मध्ये आदर्श ग्राम योजना, तंटामुक्त अभियान व तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याहस्ते निर्मलग्राम पुरस्कार मिळवून तालुक्यात आदर्श असलेले होनेवाडी गावचा उल्लेख प्रशासन पातळीवर केला जातो. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोणताही वादंग नाही.
एकोपा ठेवून समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेणेत आला. प्रत्येक प्रभागानुसार सुकाणू समिती नेमण्यात आली. सुकाणू समितीचे सदस्य जाणकार व उमेदवारीची इच्छा नसणारे निवडण्यात आले.
सुकाणू समितीने प्रभागातील सदस्यांची बैठक घेतली. इच्छुकांची नोंदणी करून घेतली. मुलाखती घेतल्या त्यातून उमेदवारांची नावे निवडणेत आली. उमेदवारांचे अर्ज फक्त सात जणांचे भरण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे आज सात जणांनी भरण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे आज सात जणांनी येवून अर्ज दाखल केले. उमेदवारी न मिळालेल्या व्यक्तींनी नाराज न होता गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे.
होनेवाडीची मतदारसंख्या ७५० असून प्रत्येक प्रभागात २५० ते २७० मतदार आहेत. प्रभाग १ व ३ मध्ये सर्वसाधारण पुरूष व सर्वसाधारण महिला तर प्रभाग दोनमध्ये इतर मागास पुरूष, सर्वसाधारण महिला व इतर मागास महिला असे आरक्षण आहे. यापूर्वी जनरल पुरूष व जनरल महिलेला सरपंचपदाची संधी मिळाली आहे. यावेळी सरपंचपदापेक्षा गावचा विकास केंद्रबिंदू मानून काम करण्याबाबत ग्रामस्थांचे एकमत झाले आहे.
होनेवाडी ग्रामस्थांनी सलग पाचव्यांदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून सर्व गावांसमोर आदर्श ठेवला आहे. निवडणुकीतून भांडण करण्यापेक्षा ग्रामस्थांचा एकोपा झालेस विकासकामे करणे शक्य आहे. जाणकार व समाजकार्य करण्याची इच्छा असणाºया उमेदवारांना ग्रामस्थांनी संधी दिली आहे.