म्हालसवडे परिसरात घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:27 AM2021-07-27T04:27:10+5:302021-07-27T04:27:10+5:30
कांचनवाडी ते घुंगूरवाडी या मार्गावरील रस्त्याच्या मधोमध मोठमोठ्या भेगा पडल्याने भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असून, या मार्गावरून वाहतूक करणे ...
कांचनवाडी ते घुंगूरवाडी या मार्गावरील रस्त्याच्या मधोमध मोठमोठ्या भेगा पडल्याने भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असून, या मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. म्हालसवडे येथील महेश सरनाईक, रावण खोपाळे, बनाबाई गुरव व मालूबाई काशीद यांच्या घरांच्या भिंती व छत कोसळले आहेत. कसबा आरळे येथील शहाजी पाटील यांच्या गुऱ्हाळघरांची पडझड झाली असून, त्यांच्या शेतातील उसाचे उभे पीकच वाहून गेले आहे. कांचनवाडी येथील उत्तम पाटील यांच्या घराची पडझड झाली आहे. भात, भुईमूग, सोयाबीन, नाचना व ऊस पिकांचे या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांच्या पडझडी व शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी नागरिकांतून होत आहे .
फोटो : कांचनवाडी ते घुंगूरवाडी मार्गावरील मुख्य रस्त्याला पडलेल्या भेगा.
छायाचित्र : राम पाटील, कांचनवाडी