हुमणी व्यवस्थापन शेतकरी मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:25 AM2020-12-06T04:25:58+5:302020-12-06T04:25:58+5:30
गारगोटी, हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला शेतकरी खूप प्रयत्न करतो, पण त्याचे प्रयत्न बऱ्याचदा निष्फळ ठरतात. याचा अभ्यास ...
गारगोटी,
हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला शेतकरी खूप प्रयत्न करतो, पण त्याचे प्रयत्न बऱ्याचदा निष्फळ ठरतात. याचा अभ्यास केला तर जाणवते की, कीड नियंत्रणाच्या पद्धती चुकीची असून योग्य पद्धतीने व सामुदायिक स्वरूपात नियंत्रण केल्यास हमखास यश येऊ शकते, असे प्रतिपादन शाहू कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग मोहिते यांनी केले.
ते गारगोटी येथे देवेकर ॲग्रो आणि रोहन हायटेक यांच्यावतीने गारगोटी येथील शाहू वाचनालयाच्या सभागृहात आयोजित ‘हुमणी कीड व्यवस्थापन आणि ऊस उत्पादन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कृषी अधिकारी डॉक्टर नंदकुमार कदम उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी नितीन भांडवले , मंडल कृषी अधिकारी ओ. एन. करळे, कृषी विस्तार अधिकारी अभिजित पाटील आणि रोहन हायटेक व संदेश कोल्हापूरचे शशिकांत चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग कुरळे यांनी केले.