इचलकरंजी : शहरातील कोविड योद्ध्यांना शनिवार (दि.१६) पासून लस देण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सकाळी ९.३० वाजता लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठी रुग्णालयात २४० डोस उपलब्ध झाले आहेत. पहिल्या टप्प्यात शंभरजणांना लस दिली जाणार आहे.
कोरोनामुळे जगभर हाहाकार उडाला होता. या महासंकटाला तोंड देत एक वर्ष निघून गेले. त्यावरील लस संपूर्ण देशभरात देण्याची मोहीम शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी आयजीएम रुग्णालयाकडे २४० डोस उपलब्ध झाले आहेत. पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, आशा वर्कर्स, अर्बन हेल्थ मिशन आदी शंभरजणांना देण्यात येणार आहे. त्यांना दुसरा डोस २८ दिवसांनंतर दिला जाणार आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
(फोटो ओळी)
१५०१२०२१-आयसीएच-१६
इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात कोविड लसीचे डोस उपलब्ध झाले.