कोविडोत्तर आव्हाने ओळखून उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:24 AM2021-09-13T04:24:08+5:302021-09-13T04:24:08+5:30

अर्थशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. विजय ककडे म्हणाले, सर्वसामान्य माणसाचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावणे हाच सहकारी चळवळीचा मुख्य ...

Identify and address post-cod challenges | कोविडोत्तर आव्हाने ओळखून उपाययोजना करा

कोविडोत्तर आव्हाने ओळखून उपाययोजना करा

Next

अर्थशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. विजय ककडे म्हणाले, सर्वसामान्य माणसाचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावणे हाच सहकारी चळवळीचा मुख्य उद्देश आहे. कार्पोरेट कंपन्यांमध्ये भांडवल महत्त्वाचे आहे. सहकारात भांडवलापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. त्यामुळे सभासद, ठेवीदार कर्जदार आणि ग्राहक यांचे हित केंद्रस्थानी ठेवून वाटचाल केली तरच सहकारी संस्था मोठ्या होतील. यावेळी ॲड. गडगे यांनी ‘मल्टिस्टेट कायदा आणि कर्जवसुली’ या विषयावर मार्गदर्शन केले. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. नेसरी शाखाध्यक्ष प्राचार्य आर. बी. पाटील यांनी स्वागत केले. संजय कालकुंद्रीकर यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. व्ही. के. दळवी यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष व्ही. के. मायदेव, डॉ. आर. एस. निळपणकर, महेश मजती, मीना रिंगणे, उमा तोरगल्ली, रेखा पोतदार, सीईओ डी. के. मायदेव, शाखा सल्लागार प्रा. डी. एम. पाटील, मा कुरणे, एस.एस. मटकर, प्राचार्य संभाजी भांबर, जे.व्ही. निचळ, पांडुरंग करंबळकर, एच.जी. देसाई, वसंत दळवी, मारुती रेडेकर, शशीकला पाटील, उज्ज्वला नाईक, शाखाधिकारी किरण कोडोळी यांच्यासह ६५ सभासदांनी प्रशिक्षण कार्यशाळेत भाग घेतला. प्रातिनिधिक स्वरूपात सभासदांना प्रमाणपत्र वितरण केले.

श्री रवळनाथ प्रतिमापूजन व कुंडीतील रोपाला पाणी घालून शिबिराचे उद्घाटन झाले. वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेले सभासद आणि विविध परीक्षेतील सभासदांच्या यशवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित कार्यशाळेत डॉ. ए. एम. गुरव यांनी मार्गदर्शन केले. शेजारी एम. एल. चौगुले, विजय ककडे, एस. एस. गडगे, प्रा. व्ही. के. मायदेव, आर. बी. पाटील आदी उपस्थित होते.

क्रमांक : १२०९२०२१-गड-०४

Web Title: Identify and address post-cod challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.