लोकसभेला पराभव झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गटाचे राजकारण संपेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:47 PM2019-03-22T15:47:04+5:302019-03-22T16:32:15+5:30

चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्याचा अंदाज आल्याने अजून निवडणुका महिनाभर लांब असतानाच महाडिक गटाचे नेते आणि माजी आमदार महाडिक यांनी ही भीती व्यक्त केली आहे.

If we lose the Lok Sabha, the mahadik group will get trouble; Fear of Mahadevrao Mahadik | लोकसभेला पराभव झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गटाचे राजकारण संपेल...

लोकसभेला पराभव झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गटाचे राजकारण संपेल...

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव झाल्यास जिल्ह्यात महाडिक गटाचे राजकारण संपणार असल्याची भीती माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केली. ते गुरुवारी खुपिरे (ता.करवीर) येथे कार्यकर्त्यांशी बोलत होते. 


चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्याचा अंदाज आल्याने अजून निवडणुका महिनाभर लांब असतानाच महाडिक गटाचे नेते आणि माजी आमदार महाडिक यांनी ही भीती व्यक्त केली आहे. लोकसभेत पुतण्याचा पराभव झाला तर कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकूळ) ची सत्ता ही जाईल, असेही भाकीत त्यांनी केले आहे.


गोकूळच्या विशेष सभेत शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी पोलिसाचे कडे तोडून मुख्य सभामंडपात धडक दिली होती. त्याचाही राग महाडिक यांनी व्यक्त केला आहे. चंद्रदीप ज्या पद्धतीने सभेला नाचत आला तसाच त्याचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असाही इशाराही महाडिक यांनी दिला आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात आमदार नरके यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचारात जोरदार पुढाकार घेतल्यानेही महाडिक यांना संताप अनावर झाला आहे.

Web Title: If we lose the Lok Sabha, the mahadik group will get trouble; Fear of Mahadevrao Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.