दोन व्हिडिओ पार्लरवर छापे : ३९ अटकेत
By admin | Published: February 25, 2016 01:33 AM2016-02-25T01:33:24+5:302016-02-25T01:34:35+5:30
कोल्हापुरात कारवाई : १०९ मशीन जप्त; २० लाखांचा मुद्देमाल, ९४ हजारांची रोकड जप्त
कोल्हापूर : शहरातील लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी या दोन ठिकाणी सुरू असणाऱ्या बेकायदेशीर व्हिडिओ गेम पार्लरवर बुधवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून सुमारे १०९ व्हिडिओ गेम मशीन्ससह सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी ३९ जणांना अटक केली, तसेच सुमारे ९४ हजारांची रोकडही जप्त केली. या दोन्हीही दुकानांचा मालक रशीद गुलाब चित्तेवान (रा. कदमवाडी, कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ माजली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने बेकायदेशीर व्यवसायाविरोधात मोहीम उघडली असून, बुधवारी रात्री लक्ष्मीपुरीतील रिगल व्हिडिओ गेम या पार्लरवर छापा टाकला. या कारवाईत हा गेम खेळण्यासाठी आलेले व कर्मचारी असे सुमारे १८ जणांना पोलिसांनी अटक केली; तर या ठिकाणी व्हिडिओ गेमची ६० मशीन्स जप्त केली; तर सुमारे ४१ हजार १३० रुपये रोख रक्कम जप्त केली. याशिवाय सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल (पान १० वर)