पाचगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:22 AM2021-04-18T04:22:06+5:302021-04-18T04:22:06+5:30
: अधिकाऱ्यांसमवेत बेठक पाचगाव : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगाव येथील पाणी प्रश्नांबाबत आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन ...
: अधिकाऱ्यांसमवेत बेठक
पाचगाव : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगाव येथील पाणी प्रश्नांबाबत आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका अधिकारी आणि पाचगाव लोकप्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेतली. पाचगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.
पाचगाव हे शहरानजीकच्या झपाट्याने लोकसंख्या वाढणारे उपनगर आहे. यामुळे, पाणीपुरवठ्याचे नियोजन करत असताना अडचणी येतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पाणीपुरवठा अडचणींबाबत आ. पाटील यांनी बैठक घेत पाचगावातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करण्याच्या सूचना जलअभियंता नारायण भोसले यांना दिल्या. या संदर्भात तत्काळ कार्यवाही करण्यास सांगितले. तसेच, पाचगावची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा वाढविण्यासंदर्भात प्राधिकरणाचे डी.के. महाजन आणि ए.डी. चौगुले यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून सूचना दिल्या.
यावेळी, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, प्रवीण कुंभार, नारायण गाडगीळ, संग्राम पोवाळकर, प्रकाश गाडगीळ, धनाजी सुर्वे, विष्णू डवरी आदी उपस्थित होते.
फोटो ओळ: १७ पाचगाव पाणीपुरवठा
पाचगाव पाणीप्रश्नाबाबत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीमध्ये बोलताना आ. ऋतुराज पाटील.