समीरला अंडा सेलमधून बाहेर काढण्यास असमर्थता

By Admin | Published: February 23, 2016 01:12 AM2016-02-23T01:12:06+5:302016-02-23T01:12:20+5:30

कारागृह प्रशासनाने दिला न्यायालयास अहवाल

Inability to take Samir out of the egg cell | समीरला अंडा सेलमधून बाहेर काढण्यास असमर्थता

समीरला अंडा सेलमधून बाहेर काढण्यास असमर्थता

googlenewsNext

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला कळंबा कारागृहातील अंडा सेलमधून बाहेर काढण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविली आहे तसा अहवाल कारागृह प्रशासनाने सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांना सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.
पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाड हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात अंडा सेलमध्ये बंदिस्त आहे. समीरचे वकील अ‍ॅड. एस. व्ही. पटवर्धन यांनी समीरचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
त्याला इतर कैद्यांप्रमाणे मोकळीक द्यावी, त्याची अंडा सेलमधून बाहेर काढून इतर कैद्यांच्या बराकमध्ये ठेवावे, त्यांच्याशी बोलणे करून द्यावे,असा विनंती अर्ज न्यायालयास केला होता. याबाबत न्यायालयाने कारागृह प्रशासनाकडे अहवाल मागितला होता.
त्यानुसार प्रशासनाने सुरक्षेअभावी समीरला अंडा सेलमधून बाहेर काढण्यास असमर्थता दर्शविली असून त्याबाबतीचा अहवाल न्यायालयास सादर केला. (प्रतिनिधी)

Web Title: Inability to take Samir out of the egg cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.