हत्तीवडे-सावरवाडी रस्ता ८५ लाख, बोलकेवाडी येथील दलितवस्ती रस्ता आणि नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम १३.५० लाख, हत्तीवडे येथील शाळा आणि आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती ३.५ लाख या विकासकामांचा प्रारंभ सकाळी ९ ते १० या वेळेत होणार आहे.
छत्रपती विद्या मंदिर हत्तीवडे येथे १०.३० वाजता कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमात २१ प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, कृषी दिनानिमित्त उत्कृष्ट शेती व्यवस्थापन आणि कृषीपूरक उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार, शाळा बंद, पण शिक्षण सुरू याअंतर्गत ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरिता टॅबचे वाटप, अंगणवाडींना बाल शैक्षणिक साहित्याचे वाटप, कृषी दिनानिमित्त लाभार्थ्यांना कृषी साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्या सुनीता रेडेकर आहेत. कार्यक्रमास अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, उद्योजक रमेश रेडेकर, शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत, मेंढोलीचे सरपंच लक्ष्मण गुडूळकर, हत्तीवडे सरपंच शकुंतला सुतार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास कोळींद्रे जि. प. मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आदित्य रेडेकर यांनी कले आहे.
फोटो - सुनीता रेडेकर : ३००६२०२१-गड-०४